जोडप्यात एकमेकांसोबत राहण्यावरुन झालेला वाद विकोपाला गेल्यानंतर पतीने संतापाच्या भरात पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाड अन् फरशी मारली. या मारहाणीत गंभीर दुखापत होऊन पत्नीचा जागीच मृत्यू झाला. जळगाव जिल्ह्यात एरंडोल शहरातील गांधीपुरा भागातील वखार गल्ली येथे सोमवारी सकाळी साडे अकरा वाजताच्या सुमारास ही घटना घडली. हर्षदा किरण मराठे (वय २७ वर्ष) असे मयत विवाहितेचे नाव आहे. या प्रकरणात पोलिसांनी संशयित पती किरण महादू मराठे (वय ३५ वर्ष) याला अटक केली आहे.
एरंडोल शहरातील गांधीपुरा भागात किरण महादू मराठे हा आई, वडील, पत्नी व दोन मुले या परिवारासह वास्तव्यास आहे. किरण हा एरंडोल शहरातील बालाजी ऑईल मिल याठिकाणी मजूर म्हणून काम करतो, व त्यावर त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवतो. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून किरणचा पत्नी हर्षदा हिच्यासोबत वेगवेगळ्या कारणांवरून कौटुंबिक वाद होता, सततच्या कौटुंबिक वादाला कंटाळून हर्षदा याला किरणकडून घटस्फोट हवा होता, ती त्याच्यासोबत एकत्र राहण्यास तयार नव्हती, मात्र किरणचा घटस्फोट देण्यास नकार होता. हर्षदा हिने सोबतच रहावे यावरुन किरण वाद घालत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
एकमेकांसोबत राहण्याच्या तसेच घटस्फोट देण्याच्या कारणावरुन सोमवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास हर्षदाचा पती किरण सोबत वाद झाला. वाद करता करता हर्षदा व किरण हे दोघे घराबाहेर पडले. गल्लीत त्यांचे जोरजोराने भांडण सुरु होते. या वादातून संतापाच्या भरात किरणने हर्षदाच्या डोक्यात कुऱ्हाड तसेच फरशी मारली. यात हर्षदा गंभीर जखमी झाल्या. अतिरक्तस्त्राव झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
नागरिकांच्या माध्यमातून घटनेची माहिती एरंडोल पोलिसांना मिळाली. त्यानुसार माहिती मिळाल्यानंतर एरंडोल पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सतीष गोराडे आणि सहकार्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. हर्षदा हिचा मृतदेह एरंडोल ग्रामीण रूग्णालयात हलविण्यात आला. घटनेची गंभीर दखत घेत पाोलिसांनी संशयित आरोपी पती किरण मराठे याला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी मयत हर्षदा हिचे माहेरचे नातेवाईक पवन राजेंद्र मराठे यांच्या फिर्यादीवरुन एरंडोल पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरिक्षक सतीश गोराडे हे करीत आहेत.
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…