ताज्याघडामोडी

सहा वर्षांपूर्वी मुलाचा खून, आईकडून शोध, लग्नात मारेकरी दिसला अन् माऊलीने तिथेच निकाल लावला

सहा वर्षांपूर्वी मुलाचा खून झाला, या प्रकरणी गुन्हा देखील दाखल झाला, पोलीस यंत्रणा आरोपीचा शोध घेत होती, मात्र आरोपीचा शोध अद्यापही लागत नव्हता. पोटच्या गोळ्याचा खून झाल्यामुळे आई अस्वस्थ होती. मुलाच्या मारेकऱ्याचा शोध घेण्यासाठी आईने देखील पाठपुरावा सुरू केला.

सहा वर्षानंतरही आईने मुलाचा आरोपीचा शोध सुरू ठेवला. अखेर सहा वर्षानंतर नातेवाईकांच्या विवाह सोहळ्यासाठी आरोपी येणार असल्याची माहिती मिळाली अन् आईने आरोपीला शोधून पोलिसांच्या ताब्यात दिले. चित्रपटातील कथेला साजेल अशी रोमांचक गोष्ट छत्रपती संभाजीनगर येथे उघडकीस आली आहे.

दरम्यान या प्रकरणी अधिक माहिती अशी की, अहमदनगर जिल्ह्यातील कोळेगाव येथे अमोल सखाराम बळे या तरुणाचा सहा जून २०१८ रोजी खून झाला होता. अमोल याचा खून करणारा रवींद्र कचरू पंडुरे हा खून झाल्यापासून फरार होता.

या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यामध्ये रवींद्र विरोधात संबंधित पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र घटना घडल्यापासून आरोपी फरार होता. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस यंत्रणा कामाला लागली होती, मात्र सहा वर्षे उलटूनही आरोपीचा पत्ता लागत नव्हता.

तळहातावरच्या फोडासारखा सांभाळलेल्या पोटच्या गोळ्याचा खून झाल्यानंतर स्वस्थ बसेल ती आई कशी. आई अलकाबाई बळे यांनी आरोपीचा सहा वर्षापासून शोध सुरूच ठेवला. आईने शोध कार्याचे सातत्य ठेवलं. दरम्यान अमूल याच्या आईच्या प्रयत्नांना यश आलं.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

2 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago