ताज्याघडामोडी

प्रेमाच्या आड येत होती प्रेयसीची आई, प्रियकराने आखली योजना, काटा असा काढला की पोलीसही चक्रावले

ताजनगरी आग्रा येथे एक खळबळजनक घटना घडली आहे. येथे एका तरुणाने प्रेयसीच्या आईची चाकूने भोसकून हत्या केली. पोलिसांना या महिलेचा मृतदेह सिकंदराच्या जंगलात सापडला. मारेकरी १२वी पर्यंत शिकला आहे. मात्र त्याने खून करण्याचा प्लॅन असा आखला होती की तो तीन दिवस पोलिसांना चकमा देत राहिला. तरुणाच्या मोबाईलवरून पोलिसांना आरोपीचा सुगावा लागला. मात्र आरोपी फरार झालेला होता. तो वारंवार त्याचे स्थान बदलत होता. अखेर शनिवारी सायंकाळी त्याला पकडण्यात आले. पोलीस पथकाचे म्हणणे आहे की आरोपी पोलिसांची दिशाभूल करत राहिला, मात्र आपल्या गुन्ह्याची कबुली त्याने दिली आहे.

पोलीस ठाणे सिकंदरा येथील भावना अरोमा येथे राहणारे उदित बजाज हे व्यावसायिक आहेत. त्यांचा बुटांचे धागे बनवण्याचा व्यवसाय आहे. त्यांना एक मुलगी असून ती अकरावीत शिकते. दयालबाग अपर्णा रिव्हरव्ह्यू येथील रहिवासी प्रखर गुप्ता यांच्याशी तिची मैत्री झाली. याची माहिती उदितची पत्नी अंजलीला झाली होती. ती आपल्या मुलीला वारंवार समजावून सांगायची की हे वय प्रेम करण्याचं नसून अभ्यासाचं असतं, पण किशोर प्रखरच्या बोलण्यात इतका गुरफटला होता की तो जे सांगायचा त्यावर तिचा विश्वास बसायचा.

अंजलीला आपल्या मुलीला प्रखरपासून दूर ठेवायचे होते. तिला प्रखरलाही धडा शिकवायचा होता, पण त्याआधीच प्रखरने अंजलीच्या मृत्यूची योजना आखली. प्रखरने अंजलीला फसवून जंगलात नेले आणि मित्राच्या मदतीने तिची हत्या केली. पोलिसांना दुसऱ्या दिवशी गुरुवारी सायंकाळी सिकंदरा येथील वनखंडी जंगलात अंजलीचा मृतदेह सापडला.

प्रखर गुप्ता याने त्याच्या मैत्रिणीचा मोबाईल हॅक केला होता. तो अंजलीच्या व्हॉट्सअॅप नंबरवरून चॅट करत होता. त्याने प्रेयसीला घर सोडण्यास सांगितले होते. मुलगी घरातून निघून गेली. यानंतर प्रखरने अंजलीच्या मोबाईलवरून सिकंदरा महादेव मंदिराचे लोकेशन तिच्या मुलीच्या मोबाईलवर पाठवले. आपली मुलगी प्रखरसोबत आहे असा विचार करून अंजली तेथे गेली. तेथे प्रखरने अंजलीला चाकूने वार करून ठार केले. पोलिसांनी तपास केला असता हत्येचा कट पाहून पोलीसही चक्रावले.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी एसक्यूएल प्रशिक्षण; ७५ हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग

प्लेसमेंटच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यविकासासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचा पुढाकार सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर…

20 hours ago

साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराला वेग; डॉ. श्रुती जोशी यांच्या नेतृत्वाखाली सदिच्छा भेटींचा धडाका!

शैक्षणिक संस्थांचा पाठिंबा; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला सातारा : पुणे विभाग…

6 days ago

शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांचा निर्धार; प्राध्यापकांचे रोजगारहित आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाला प्राधान्य

NEP २०२०च्या नावाखाली प्राध्यापकांची पदे कमी होऊ देणार नाही; आश्रमशाळांच्या सुधारणांसाठी कटिबद्ध! पुणे : राष्ट्रीय…

6 days ago

विजयादशमीच्या मुहूर्तावर साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराचा झंझावात!

गृहभेटी, दूरध्वनी संपर्क आणि वैयक्तिक संवादातून शिक्षक मतदारांपर्यंत पोहोचण्यावर भर   सातारा : पुणे विभाग…

7 days ago

सांगोला तालुक्यात डॉ.बी.पी. रोंगे सरांचा दबदबा

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर विजयी होणार सांगोला– राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर…

1 week ago

सांगली जिल्ह्यात ज्ञानयात्री डॉ.बी.पी. रोंगे सरांना उत्स्फूर्त प्रतिसाद

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर १०० टक्के विजयी होणार मिरज – राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक…

1 week ago