सासरच्या मंडळीकडून होत असलेल्या शारीरिक आणि मानसिक जाचाला कंटाळून एका विवाहितेने राहत्या घरामध्ये आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना परभणीच्या पूर्णा तालुक्यातील आव्हई येथे घडली. विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीसह सासू-सासऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोचना ज्ञानेश्वर पवार (वय ३२) असं आत्महत्या केलेल्या विवाहितेचं नाव आहे.
लोचना यांचा आव्हई येथील ज्ञानेश्वर उध्दव पवार यांच्यासोबत १२ वर्षापूर्वी विवाह झाला होता. लग्नानंतर त्यांना दोन अपत्य देखील झाली. मात्र, मागील काही दिवसापासून लोचना यांच्या पतीला दारूचे व्यसन जडले होते. त्यामुळे पती कामधंदा न करता “माहेरहून पैसे घेऊन ये”, असं म्हणत विवाहितेला मारहाण करत होता. सासू-सासरे यांनी देखील विवाहितेला शारीरिक आणि मानसिक त्रास दिला.
त्रासाला कंटाळून काही महिन्यांपूर्वी या विवाहितेनं विषारी औषध प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. यानंतर नातेवाईकांनी मध्यस्थी करुन हे प्रकरण मिटवलं होतं. मात्र, या घटनेनंतरही सासरकडील मंडळींकडून होणारा त्रास काही कमी झाला नाही. अखेर या त्रासाला कंटाळून लोचना यांनी आपल्या राहत्या घरी दोरीच्या साहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली.
मृत महिलेच्या मुलाने ग्रामस्थांना या घटनेची माहिती दिली. घटनेनंतर पती ज्ञानेश्वर, सासु सखुबाई, सासरा उध्दव श्रीपती पवार हे गावातून पसार झाले. पोलीस पाटील संदीप सोनवणे यांनी पूर्णा पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलीस निरिक्षक सुभाष मारकड, साहाय्यक पोलीस निरिक्षक गायकवाड, साहाय्यक पोलीस उपनिरिक्षक चव्हाण, जमादार अमर चाउस यांनी घटनास्थळी भेट दिली.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…