ताज्याघडामोडी

Whatsapp मेसेज आला, ‘खिशात ३ लाख, मागे गुंड लागलेत, मला मदत करा’ २ तासांनी सापडला मृतदेह

महावितरण सबस्टेशनच्या कार्यालयात कार्यरत असलेले सिनिअर ऑपरेटर यांचा तापी नदीपात्रात मृतदेह आढळून आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मृत्यूआधी त्यांनी व्हॉट्सअप ग्रुपवर मॅसेज टाकला होता. ज्यात त्यांनी म्हटलं की, “माझ्या मागे ४ ते ५ गुंड मुलं लागले असून हे सर्व अनोळखी आहेत. मला काहीच सुचत नाहीये. माझ्या सोबत ३ लाख रूपये आहेत. मी कसा तरी स्व:ताला वाचवण्याचा प्रयत्न करत असून मला मदत करा” असा त्यांनी मॅसेज टाकला होता आणि त्याच्या दोन तासानंतर नदीपात्रात त्यांचा मृतदेह आढळून आला आहे.

शिरपूर तालुक्यातील बाळदे ता. शिरपूर येथील सबस्टेशन इथं प्रवीण विजय गवते वय ४२ रा.चिमठाणे ता. शिंदखेडा इथे सिनीअर ऑपरेटर म्हणून कार्यरत होते. त्यांची काल दुपारी गिधाडे तापी नदी पुलावर मोटरसायकल बेवारस स्थितीत आढळून आली होती. प्रवीण गवते यांची रात्रपाळी असल्याने ते रात्रीपासून बाळदे येथील सबस्टेशनवर होते. सकाळी ८:३० वाजता ते घरी चिमठाणे इथे जाण्यासाठी निघाले होते. मात्र २ वाजून ५२ मिनिटांनी त्यांनी व्हॉट्सअप ग्रुपवर एक मॅसेज टाकला. ज्यात आपल्याकडे ३ लाख असून काही गुंडही मागे लागल्याचं त्यांनी सांगितलं. ग्रुपमधील मेसेज वाचून त्यांना संपर्क देखील साधण्यात आला होता.

घटनेनंतर त्यांची मोटरसायकल गिधाडे तापी पुलावर आढळून आली होती. त्यांचा गिधाडे तापी नदीपात्रात शोध सुरु केला असता प्रवीण गवते यांचा तापीनदी पात्रात मृतदेह आढळून आला. पोलिसांनी तातडीने मृतदेह ताब्यात घेऊन तो शिंदखेडा येथील रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आला. मयत प्रवीण गवते यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवरील मेसेजमुळे अनेक तर्कवितर्क लावण्यात येत असून याप्रकरणात पोलीस काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

3 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago