नागपूर शहरातील गोळीबार चौक येथील शिव भोजनालयात जेवण न दिल्याच्या कारणावरून चाकूने वार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उधार जेवण देण्यास नकार दिल्याने एका मद्यधुंद तरुणाने हॉटेल मालकावर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात मालक गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमीच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी प्रदीप निखारे (वय ३०,रा.मोचीपुरा, पाचपावली) याला अटक केली. ही घटना शुक्रवारी सकाळी अकरा वाजता गोळीबार चौकात घडली.
मिळालेल्या माहितीनुसार,शहरातील गोळीबार चौकामध्ये फिर्यादीचे शिव भोजनालय आहे.या भोजनालयाचे मालक विजय सुभाष पौनीकर (वय 50, रा. तांडापेठ, जुनी वस्ती पाचपावली) हे मागील दोन वर्षांपासून सकाळी शिवभोजन थाळीचे भोजनालय चालवतात आणि इतर वेळेत फोटो काढण्याचे काम करतात.
आरोपी प्रदीप नामदेव निखारे हा फिर्यादींच्या उपाहारगृहात जेवायला येत असल्यामुळे त्यांची चांगली ओळख होती. शुक्रवारी सकाळी प्रदीप दारू पिऊन त्यांच्या भोजनालयात आला. त्यावेळी प्रदीप याने माझ्याकडे पैसे नाहीत मला ऊधार जेवण द्या अशी मागणी केली. पौनीकर यांनी आधी पैसे द्या, पैसे दिल्यानंतर जेवण देतो असे सांगितले असता, आरोपीने त्यांच्याशी गैरवर्तन केले. त्यामुळे तेथील लोकांनी आरोपीचा पाठलाग केला.
मात्र, यामुळे दुखावलेल्या प्रदीपने बाहेर जाऊन थर्माकोल कटिंग कटर आणून पौनिकर यांच्यावर जीवघेणा हल्ला करत त्यांना गंभीर जखमी केले. शिवभोजन केंद्रावर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही घटना कैद झाली आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…