ताज्याघडामोडी

शेतात बायकोवर वार; शिर हातात घेऊन गावात आला; दारात ठेवून कित्येक तास बसून राहिला

पतीनं पत्नीचं शिर धडावेगळं केल्याची धक्कादायक घटना ओदिशातील गजपती जिल्ह्यात घडली आहे. दाम्पत्य सारा गावाजवळ असलेल्या शेतात गेले होते. तेव्हा तिथे त्यांच्यात काही कारणावरुन वाद झाला. वाद विकोपाला गेल्यानंतर पतीनं पत्नीची हत्या केली. तिचं शिर धडावेगळं केलं. पत्नीचं शिर घेऊन पती गावात पोहोचला. उर्मिला कारजी असं मृत महिलेचं नाव असून चंद्रशेखर कारजी असं आरोपी पतीचं नाव आहे. पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. हत्या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत.

गुरुवारी सकाळच्या सुमारास उर्मिला आणि चंद्रशेखर त्यांच्या शेतात गेले होते. तिथे त्यांच्यात वाद झाला. या वादाचं नेमकं कारण स्पष्ट झालेलं नाही. भांडण वाढत गेल्यानं चंद्रशेखर संतापला. त्याचा स्वत:वरील संयम सुटला. हातात असलेल्या धारदार कुऱ्हाडीनं त्यानं उर्मिलाच्या मानेवर वार केले. पत्नीचं शिर धडावेगळं केल्यानंतरच तो शांत बसला.

पत्नीचं शिर हातात घेऊन चंद्रशेखर गावात आला. त्याला पाहून ग्रामस्थ भयभीत झाले. चंद्रेशेखरनं घर गाठलं आणि पत्नीचं शिर दाराच्या समोर ठेवलं. त्याच्या शेजारीच चंद्रशेखर अतिशय शांतपणे बसला. हा प्रकार पाहून ग्रामस्थांची पाचावर धारण बसली. घाबरलेल्या गावकऱ्यांनी झालेल्या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तातडीनं गाव गाठलं. पोलीस चंद्रशेखरच्या घराजवळ पोहोचले. चंद्रशेखर अतिशय शांतपणे पत्नीच्या शिराजवळ बसलेला त्यांना दिसला.

पोलिसांनी चंद्रशेखरला ताब्यात घेतलं. त्याची चौकशी केली. मीच पत्नीला संपवलं, अशी कबुली त्यानं दिली. यानंतर पोलिसांनी चंद्रशेखरला अटक केली. ‘पत्नीची हत्या केला. तिचं शिर धडावेगळं केलं. धड शेतात टाकून शिर घरी आणलं,’ अशी माहिती त्यानं दिली. यानंतर पोलिसांनी शेतात जाऊन धड ताब्यात घेऊन ते शवविच्छेदनासाठी पाठवलं.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी एसक्यूएल प्रशिक्षण; ७५ हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग

प्लेसमेंटच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यविकासासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचा पुढाकार सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर…

6 days ago

साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराला वेग; डॉ. श्रुती जोशी यांच्या नेतृत्वाखाली सदिच्छा भेटींचा धडाका!

शैक्षणिक संस्थांचा पाठिंबा; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला सातारा : पुणे विभाग…

2 weeks ago

शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांचा निर्धार; प्राध्यापकांचे रोजगारहित आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाला प्राधान्य

NEP २०२०च्या नावाखाली प्राध्यापकांची पदे कमी होऊ देणार नाही; आश्रमशाळांच्या सुधारणांसाठी कटिबद्ध! पुणे : राष्ट्रीय…

2 weeks ago

विजयादशमीच्या मुहूर्तावर साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराचा झंझावात!

गृहभेटी, दूरध्वनी संपर्क आणि वैयक्तिक संवादातून शिक्षक मतदारांपर्यंत पोहोचण्यावर भर   सातारा : पुणे विभाग…

2 weeks ago

सांगोला तालुक्यात डॉ.बी.पी. रोंगे सरांचा दबदबा

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर विजयी होणार सांगोला– राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर…

2 weeks ago

सांगली जिल्ह्यात ज्ञानयात्री डॉ.बी.पी. रोंगे सरांना उत्स्फूर्त प्रतिसाद

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर १०० टक्के विजयी होणार मिरज – राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक…

2 weeks ago