कौटुंबिक कलहातून रेल्वे कर्मचारी तरुणाने पत्नी आणि वृद्ध आईचा खून केला. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहरात घडलेल्या घटनेने खळबळ उडाली आहे. पत्नी व आई झोपेत असताना लोखंडी वस्तूने वार करत तरुणाने दोघींचा खून केल्याचा आरोप आहे. मंगळवारी पहाटेच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली आहे.
आराध्या हेमंत भूषण (वय २३ वर्ष) असे मयत पत्नी तर सुशीलादेवी भूषण (वय ६३ वर्ष) असे मयत आईचे नाव आहे. या घटनेत आरोपीने मेहुण्यावर सुद्धा वार केले असून तो जखमी आहे. त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दुहेरी हत्या प्रकरणी आरोपी हेमंत भूषण श्रवणकुमार (वय ३२) यास पोलिसांनी अटक केली असून त्याने खून केल्याची कबुली सुद्धा पोलिसांना दिली आहे.
हेमंत श्रवणकुमार भूषण हा भुसावळ रेल्वे विभागात चतुर्थ श्रेणी कर्मचारी आहे. पत्नी आराध्या व आई सुशीलादेवी यांच्यासह तो भुसावळ शहारातील वांजोळा रोड, बालाजी लॉजमागील शगुन इस्टेटमध्ये काही महिन्यांपूर्वीच वास्तव्यास आला होता. २ डिसेंबर २०२२ रोजी म्हणजेच अवघ्या पाच महिन्यांपूर्वीच त्याचे आराध्या हिच्यासोबत लग्न झाले होते. मात्र ती त्याला आवडत नसल्याने कुटुंबात वाद सुरू होते. त्यातून रेल्वे कर्मचारी असलेल्या पतीचे सातत्याने खटके उडत होते.
पत्नीचा खून करण्याचे नियोजन केल्याने रेल्वे कामासाठी वापरले जाणारे ब्रेक ब्लॉक हे लोखंडी साहित्य हेमंत याने घरात आणून ठेवले होते. मंगळवारी पहाटे दाम्पत्यात कडाक्याचे भांडण झाले. याच वादातून हेमंत याने मंगळवारी पहाटे चार ते साडेचार वाजेच्या सुमारास झोपेत असलेली त्याची पत्नी आराध्या व आई सुशीलादेवी या दोघींच्या डोक्यात तसेच तोंडावर घरातील लोखंडी तवा मारला. या घटनेत आराध्या व सुशीलादेवी या दोघींचा जागीच मृत्यू झाला.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…