ताज्याघडामोडी

१० वाजले, लेक-नात उठले नाही, बघतात तर बेडरुमध्ये दोघीही… बापाचा हृदय पिळवटणारा आक्रोश

बुटीबोरीमध्ये शिक्षिका असलेल्याने आईने तिच्या मुलीसह कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना बुटीबोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ओम साईनगर येथील प्रभाग क्रमांक ७ मध्ये रविवारी (२१ मे) सकाळी साडेदहाच्या सुमारास उघडकीस आली.

चेतना शिरीष भक्ते (वय ३५) आणि हर्षिका उर्फ छवी शिरीष भक्ते (वय ११) अशी मृत मायलेकींची नावे आहेत. मृत चेतनाचे पतीशी पटत नसल्याने ती आपल्या मुलीसह वडिलांच्या घरी राहत होती. उदरनिर्वाहासाठी ती परिसरातील एका खासगी शाळेत शिक्षिका म्हणून काम करत होती. शनिवारी रात्री जेवण करून ती झोपण्यासाठी तिच्या खोलीत गेली. दरम्यान, रविवारी सकाळी १० वाजेनंतरही मुलगी आणि नात न उठल्याने वडील दिनेश गुरवे त्यांना उठवण्यासाठी गेले. खोलीचा दरवाजा ठोठावल्यानंतरही आतून प्रतिसाद आला नाही.

त्यानंतर शेजारील भाडेकरूच्या खोलीतून मुलीच्या खोलीत गेले असता मुलीने आत्महत्या केल्याचे त्यांना समजले. मुलगी आणि नात यांना मृतावस्थेत पाहताच वडिलांनी हंबरडा फोडला. त्यांनी आरडाओरड करताच सगळे धावून आले, त्यांनी मुलाला बोलावून घेतले.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनीही घटनास्थळ गाठलं. त्यानंतर पोलिसांनी पंचनामा करुन मृत चेतनाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. तसेच मुलगी छावीची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला तातडीने बुटीबोरी येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तिची परिस्थिती पाहता डॉक्टरांनी तिला नागपूर येथील खासगी रुग्णालयात पाठवलं. पण, सारे प्रयत्न निष्फळ ठरले आणि उपचारादरम्यान छवीचा मृत्यू झाला.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

15 hours ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

2 days ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago