ताज्याघडामोडी

राज्यावर पुढचे ३ दिवस अस्मानी संकट, ‘या’ जिल्ह्याला हवामान खात्याचा अलर्ट जारी

राज्यात ऐन उन्हाळ्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आणि सर्वत्र शेतीचे नुकसान झाल्याचं पाहायला मिळालं. अशात आता कडक उन्हाच्या झळा नागरिक सहन करत आहेत. या सगळ्यात मात्र पुढचे ३ दिवस राज्यासाठी महत्त्वाचे असणारे आहेत. कारण, हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हवामान खात्याच्या माहितीनुसार, यावेळी वेगाने वारे वाहण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी आपल्या शेतमालाची काळजी घ्यावी आणि धान्याची योग्य त्या ठिकाणी साठवणूक करावी, अशा सूचना हवामान खात्याकडून देण्यात आल्या आहेत. यंदा झालेल्या अवकाळी पावसामुळे आधीच शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अशात आता पुन्हा पावसाचा इशारा देण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे.

दरम्यान, यंदा मान्सून उशिरा दाखल होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामानशा खात्याकडून वर्तवण्यात आला होता. मात्र, उशिराने दाखल होणारा पाऊस १९ मे रोजी दक्षिण पूर्व बंगालच्या उपसागरात, अंदमान निकोबार बेटांवर आणि अंदमानच्या समुद्रात दाखल झाला. त्यामुळे यंदा वेळेतच पाऊस होईल असाही अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

एकीकडे राज्यात उन्हाचा पारा वाढत असताना दुसरीकडे काल नंदुरबारमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली. अतिवृष्टी झाल्यामुळे इथं ३५ हून अधिक संसार उध्वस्त झाले. नदी-नाल्यांना पूर आले तर अनेक झाडं उन्मळून पडल्याचं चित्र पाहायला मिळालं.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

15 hours ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

2 days ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago