मध्य प्रदेशच्या खरगोनमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एक प्रेमी युगुल विष प्राशन करुन पोलीस ठाण्यात पोहोचलं. त्या दोघांना लग्न करायचं होतं. त्यासाठी त्यांनी पोलिसांची मदत मागितली. दोघांनी विष प्राशन केल्याचं समजताच पोलिसांनी त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल केलं. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
पोलिसांनी शवविच्छेदन करून दोघांचे मृतदेह ग्रामस्थांच्या ताब्यात दिले. खरगोन जिल्ह्यातील कसरावद पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. परिसरातील एका तरुणाचे तरुणीशी प्रेमसंबंध होते. दोघे विष पिऊन पोलीस ठाण्यात पोहोचले. त्यांनी लग्नासाठी पोलिसांची मदत मागितली. त्यानंतर दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. प्रथमोपचारानंतर त्यांना जिल्हा रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र आयसीयू वॉर्डमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
२१ वर्षांची प्रिती भालसे आणि २६ वर्षांच्या यशवंत वाघदरे यांचे प्रेमसंबंध होते. कुटुंबियांचा लग्नाला विरोध असल्यानं दोघे किटकनाशक प्यायले. यानंतर दोघांनी पोलीस ठाणं गाठलं. त्यांनी पोलिसांपुढे आपबिती मांडली. ‘आमचे दोन वर्षांपासून प्रेमसंबंध आहेत. त्यामुळे आमचं लग्न लावून द्या. आम्हाला मदत करा,’ असं म्हणत त्यांनी पोलिसांकडे सहाय्य मागितलं. आपण किटकनाशक प्राशन केल्याचंही दोघांनी सांगितलं. त्यानंतर त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र त्यांना वाचवण्यात डॉक्टरांना अपयश आलं.
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…