जुगाराचा नाद लागलेल्या एका विकृत तरुणाचे घृणास्पद कृत्य मोबाईलमुळे उघडकीस आलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे या विकृत आरोपी मुलींचे फोटो इंस्ट्राग्रामधून कॉपी करायचा. फोटोला एडिट करत मुलींच्या फोटोच्या चेहऱ्याखालील भागाचे अश्लील फोटोत रूपांतर करत आपल्या मोबाईलच्या गॅलरीत ठेवत होता. मात्र, जुगारात तो मोबाईल हरल्याने त्याचा विकृतपणा समोर आला. या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने उल्हासनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन दोघांविरोधात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करताच दोघांनाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पियूष कृपलानी आणि वरुण रोहरा असे अटक केलेल्या विकृतांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, एक महिला उल्हासनगरमध्ये राहत असून तिला १५ वर्षांची मुलगी आहे. या अल्पवयीन मुलीने दोन वर्षांपूर्वी तिच्या इंस्ट्राग्राम अकाऊंटवर स्वतःचे फोटो अपलोड केले होते. दुसरीकडे इंस्ट्राग्रामवर कायम अपडेट असलेला आरोपी पियूष कृपलानी याने त्या अल्पवयीन मुलीच्या अकाऊंटवरून तिचे फोटो कॉपी केले. त्यानंतर फोटोच्या चेहऱ्याखालील भाग एडिट करून त्या फोटोचे रूपांतर अश्लील फोटोमध्ये करून तो आपल्या मोबाइलच्या गॅलरीत सेव्ह करून ठेवला होता.
दरम्यानच्या काळात आरोपी पियूष हा काही दिवसांपूर्वी जुगारात पैसे हरला होता. मात्र, त्याच्याकडे पैसे नसल्याने जुगार अड्ड्याच्या मालकाने त्याच्याकडील आय फोन-१३ कंपनीचा मोबाईल हिसकावून घेतला. त्यानंतर मोबाईल परत मिळवण्यासाठी आरोपी पियूष याने त्याचा मित्र वरुण रोहराला गाठले. त्याच्याकडे जुगार अड्ड्याच्या मालकाने घेतलेला मोबाईल सोडवण्यासाठी १६ हजार रुपयांची मागणी करत “मोबाईल तुझ्याकडे ठेव”, असंही सांगितले. त्यानंतर आरोपी वरुणने साहिल नावाच्या मित्राकडून १६ हजार रुपये उधार घेऊन तो मोबाईल सोडवून स्वतः जवळ ठेवला होता.
दरम्यान गेल्याच आठवड्यात आरोपी वरुण रोहरा हा जुगारी पियूषच्या मोबाइल गॅलरीमधील फोटो, व्हिडिओ बघत असतानाच त्याला मोबाईल गॅलरीत अनेक मुलींचे अश्लील फोटो दिसले होते. हे फोटो पाहून वरुणने याची माहिती त्याच्या ओळखीचा समाजसेवक नवीन डिगवानी यांना दिली. त्यानंतर समाजसेवक नवीननेही मोबाईल मधील अनेक मुलींचे फोटो पाहात असतानाच त्या फोटोमध्ये एक १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी ओळखीची निघाली. त्यानंतर या फोटोबाबत पीडित मुलीच्या आईशी संपर्क करून मुलीच्या अश्लील फोटोबद्दल माहिती दिली.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…