एका ब्युटीशियनने तिच्या विवाहित प्रियकराच्या पत्नीवर अॅसिड हल्ला केला. त्यानंतर तिने पोलीस ठाणे गाठून तिच्या प्रियकरावरही बलात्काराचा गुन्हा दाखल केला.दुसरीकडे अॅसिड हल्ल्यात जखमी झालेल्या पत्नीला रुग्णालयात दाखल केल्यानंतर पतीनेही प्रेयसीवर अॅसिड हल्ल्याचा गुन्हा दाखल केला आहे. लग्नाच्या बहाण्याने विवाहित प्रियकराने तिला पाच वर्षे लिव्ह इनमध्ये ठेवल्याचा आरोप ब्युटीशियनने केला आहे. प्रेयसी 20 लाख रुपयांसाठी ब्लॅकमेल करत असल्याचा आरोप प्रियकराने केला आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.
ग्वाल्हेरच्या जनकगंज पोलीस स्टेशनच्या राम दवारा भागात राहणाऱ्या 32 वर्षीय श्वेता बन्सल यांच्यावर संजय नगर भागातील एका 34 वर्षीय ब्युटीशियनने हल्ला केला. 18 मे रोजी दुपारी 3 वाजता घडलेल्या या घटनेत श्वेता गंभीर जखमी झाली होती. तिला वाचवताना पती अमित बन्सलही भाजला. अपघातानंतर अमितने पत्नी श्वेता हिला खासगी रुग्णालयात दाखल केलं.
अमित आणि श्वेता यांनी सांगितलं की, ब्युटीशियन त्यांना 20 लाख रुपयांसाठी ब्लॅकमेल करत आहे. अमितने 19 मे रोजी दुपारी 2 वाजता जनकगंज पोलीस स्टेशन गाठलं आणि आरोपी ब्युटीशियनविरुद्ध अॅसिड हल्ल्याप्रकरणी एफआयआर दाखल केली. 18 मे रोजी दुपारी 3 वाजता विवाहित प्रियकराच्या पत्नीवर अॅसिड हल्ला झाल्यानंतर, 8 वाजता ब्युटीशियनने जनकगंज पोलीस ठाण्यात जाऊन अमितवर बलात्काराचा गुन्हा दाखल केला. ब्युटीशियनने एफआयआरमध्ये सांगितलं की, अमितने तिच्याशी मैत्री केली आणि नंतर शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
तिने आरोप केला आहे, की अमितने तिला 23 मे 2019 ते 15 मे 2023 पर्यंत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये ठेवलं आणि तिच्यावर बलात्कार केला. यादरम्यान त्याने लग्नाचं वचनही दिलं, पण लग्न केलं नाही. काही दिवसांपूर्वी अमितने फसवणूक करून तिला फ्लॅट रिकामा करायला लावला. ब्युटीशियनचा आरोप आहे, की ती अमितशी बोलण्यासाठी त्याच्या घरी गेली होती, पण तिने अॅसिड फेकलं नाही.

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…