ताज्याघडामोडी

वडिलांच्या वर्षश्राद्धालाच माझा अखेरचा श्वास; पोराने शपथ घेतली, तो दिवस उगवला अन्…

जिल्ह्यातील मुखेड शहरात शुक्रवारी एक मन हेलावून टाकणारी घटना घडली. वडिलांच्या वर्षश्राद्धालाच मुलाने आत्महत्या करत आपलं आयुष्य संपवलं. परमेश्वर उर्फ अमोल महाले (वय २८) असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे.

परेमश्वर उर्फ अमोल महाळे हा मुखेड शहरातील वेताळ गल्ली येथे राहत होता. वर्षभरापूर्वी त्याचे वडील नागनाथ धोंडिबा महाळे यांचं निधन झालं होतं. वडिलांच्या निधनाने परमेश्वर हा दुःखात होता. तसेच, आपल्याला वडिलांची नेहमी आठवण येते त्यामुळे “वडिलांच्या वर्षश्राद्धालाच मी मरणार”, असं तो नेहमी लोकांना सांगायचा असं गावाकऱ्यांनी सांगितलं. मात्र, त्याच्या बोलण्याकडे लोकांनी दुर्लक्ष केलं. कुटुंबियांनी देखील त्याचे बोलणे जास्त मनावर घेतलं नाही.

शुक्रवारी नागनाथ महाळे यांची वर्षश्राद्ध होतं. घरात वर्षश्राद्धाचा कार्यक्रम सुरु होता. यावेळी परमेश्वर हा बाहेर जातो असं सांगून घराबाहेर पडला. मात्र, थोड्या वेळानंतर त्याने घराजवळ असलेल्या झाडाला गळफास घेऊन आपल्या आयुष्याची दोर कापली. गल्लीतील काही नागरिकांना परमेश्वरचा मृतदेह झाडाला लटकेल्या अवस्थेत आढळून आला. घरात वर्षश्राद्धाचा कर्यक्रम सुरु असतानाच परमेश्वरने आपल्या वडिलांच्या आठवणीत आत्महत्या केल्याने सर्वांना धक्का बसला.

एक वर्षापूर्वी पतीचं निधन आणि त्यानंतर पतीच्या वर्षश्राद्धाच्या दिवशीच मुलाचा झाडाला लटकलेल्या अवस्थेत पाहून आईला मोठा धक्का बसला आहे. या घटनेनं मुखेड शहरात हळहळ व्यक्त होतं आहे. दरम्यान, घटनेची माहिती मुखेड पोलिसांना देण्यात आली, त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा करुन आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

15 hours ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

2 days ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago