इयत्ता ७ वीत शिकणाऱ्या मुलाची ८ वीत शिकणाऱ्या बहिणीच्या वर्गमैत्रिणीवर जीव जडला. त्यांचं कोवळ्या वयातील प्रेम काही दिवसांतच फुलू लागले. मुलगी चार महिन्यांची गरोदर राहिल्यानंतर डॉक्टरांकडे गेली असता हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी पोलिसांनी तक्रारीच्या आधारे इयत्ता सातवीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ वर्षांची मुलगी मौदा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावात तिच्या आई-वडिलांसोबत राहते. शाळेत जाण्यापूर्वी ती वर्गमैत्रिणीच्या घरी जात होती. मुलगी आणि तिची मैत्रीण एकत्र शाळेत जात होते. मैत्रिणीचा लहान भाऊ हा सातवीत आहे. मुलगी आणि तिच्या मैत्रिणीचा लहान भाऊ यांची मैत्री झाली. दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. बहीण घरी नसतानाही मुलगी त्याला भेटायला येऊ लागली. यासोबतच मुलगाही शाळेचे पुस्तक घेण्याच्या बहाण्याने तिच्या घरी जात असे.
गेल्या २५ जानेवारीला मुलगी तिच्या मैत्रिणीला भेटण्यासाठी घरी आली. मात्र, मैत्रीण ही आई-वडिलांसोबत शेतात गेली होती. त्यावेळी मैत्रिणीचा भाऊ घरी एकटाच होता. तेव्हा दोघांनी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. अशाप्रकारे त्यांचे आई-वडिलांनी शेतात गेल्यानंतर त्यांनी वारंवार शारीरिक संबंध ठेवले.
एप्रिल महिन्यात मुलीला पोटात दुखू लागले. त्यामुळे तिला आईने खासगी रुग्णालयात नेले. तपासणीत मुलगी चार महिन्यांची गर्भवती असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. हे ऐकताच तिच्या आईच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांच्या यावर विश्वासच बसेना. शेवटी डॉक्टरांनी पुन्हा तपासणी करून खात्री केली. तेव्हा आईने तिथेच मुलीच्या कानशिलात लगावली आणि तिला घरी नेले. सायंकाळी नातेवाईकांनी विचारणा केली, तेव्हा मुलीने अल्पवयीन प्रियकराबाबत सांगितलं.
नातेवाईकांनी अल्पवयीन प्रियकराला मुलीच्या घरी बोलावले. मुलाने कबूल केले की माझे तिच्यावर प्रेम आहे आणि आम्ही लग्न करणार आहोत. हे प्रकरण मौदा पोलिस ठाण्यात पोहोचले. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी सातव्या वर्गात शिकणाऱ्या मुलाला ताब्यात घेऊन बालसुधारगृहात पाठवले, सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…