ताज्याघडामोडी

लुडो खेळता-खेळता सूत जुळलं, जावई-सासूची लव्ह स्टोरी सुरु, भेटायला गेला अन् अनर्थ घडला…

लुडो खेळताना एका जावयाला आपल्याच चुलत विधवा सासूवर प्रेम जडलं. हा जावई गुपचूपपणे सासूला भेटायलाही जायचा. पण, ग्रामस्थांना याची माहिती झाली आणि मग या जावयासोबत धक्कादायक प्रकार घडला. त्याला वाटलं की रात्री अंधाराचा फायदा घेऊन आपल्या प्रेयसी सासूला भेटून येईल. मात्र, घडलं भलतंच.

संपूर्ण प्रकरण बिहारच्या जमुईच्या लक्ष्मीपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील आहे. बुधवारी रात्री उशिरा हा तरुण आपल्या चुलत विधवा सासूला भेटण्यासाठी तिच्या माहेरीपोहोचला. रात्रीच्या अंधारात भेटायला आलेल्या जावयाला याची कल्पनाही नव्हती की स्थानिक तिच्या घरचे लोक त्याला पकडतील. पुढच्या काहीच वेळात ताच्यासोबत असं काही घडलं की त्याला चांगलीच अद्दल घडली. गावकऱ्यांनी त्याला ओलिस धरुन त्याला बेदम मारहाण केली. गंभीर जखमी झालेल्या जावयाला नंतर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेले.

जखमी तरुण बांका जिल्ह्यातील रहिवासी आहे. आरोपीचा विवाह जमुई जिल्ह्यातील हंसडीह गावात झाला होता. आरोपी तरुण करोनाच्या काळात लॉकडाऊनमध्ये लुडो खेळत असे. दरम्यान, तो त्याच्या चुलत विधवा सासूच्या प्रेमात पडला. तीव वर्षांपासून या दोघांमध्ये प्रेमसंबंध आहेत. बुधवारी रात्री उशिरा या जावयाने आपल्या प्रेयसीला भेटण्याचा निर्णय केला आणि तो लक्ष्मीपूर येथील सासूबाईंच्या गावी पोहोचला.

मात्र, रात्रीच्या अंधारात तो आपल्या सासूला भेटत असतानाच गावकरी आणि कुटुंबीय तेथे जमले. त्यानंतर ओलीस ठेवले आणि अनेक तास त्याला मारहाण करण्यात आली. नंतर गावकऱ्यांनीच त्याला लक्ष्मीपूर पोलिस ठाण्याच्या पोलिसांच्या ताब्यात दिले.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

15 hours ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

2 days ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago