महाप्रबोधन यात्रेच्या सभेआधीच बीडमध्ये ठाकरे गटाच्या शिवसैनिकांमध्ये राडा झाला आहे. बीड शहराच्या माने कॉम्प्लेक्स परिसरामध्ये सभेच्या ठिकाणची पाहणी करतानाच शिवसैनिकांमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळालं. ठाकरेंच्या जिल्हाप्रमुखाची गाडी फोडण्याचा प्रकार घडला आहे.
उपजिल्हाप्रमुख गणेश वरेकर आणि जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांच्यात शाब्दिक बाचाबाचीतून हा वाद विकोपाला गेला, पण अजूनही पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. सुषमा अंधारे यांच्यासमोरच हा राडा झाल्याने काही काळ गोंधळ उडाला होता, शेवटी सुषमा अंधारे यांनीच मध्यस्थी करून हा वाद मिटवण्यात आला. शिवसेना जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांच्या गाडीची काचही या राड्यात फुटली आहे.
शिवसेना ठाकरे गटाच्या महाप्रबोधन यात्रेमध्ये संजय राऊत आणि सुषमा अंधारे यांची जाहीर सभा बीडमध्ये होणार आहे. या सभेआधीच ठाकरे गटातला अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. दरम्यान गैरसमजातून वाद झाला असून हा वाद आता मिटलेला आहे, असं जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी सांगितलं आहे.
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…