गुरुवारी सकाळी रेल्वे स्थानकावरील संघमित्रा एक्स्प्रेस ट्रेनच्या एसएलआर कोचच्या टॉयलेटमध्ये एका व्यक्तीचा मृतदेह आढळल्याची माहिती समोर आली आहे. रामसेवक भुईया असे मृताचे नाव असून तो बिहारचा रहिवासी आहे. घटनेची फिर्याद मिळाल्यानंतर जीआरपी नागपूर यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला असून आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू आहे.
बंगळुरूहून दानापूरला जाणाऱ्या संघमित्रा एक्स्प्रेसच्या एसएलआर कोचच्या टॉयलेटमध्ये प्रवाशाचा मृतदेह आढळला. ही व्यक्ती बंगळुरूहून बिहारमधील औरंगाबादला जात होती. ही एक्स्प्रेस गुरुवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास नागपुरात पोहोचली. प्रवासी उतरण्यासाठी प्रवेशद्वाराजवळ येतात. त्यामुळे येथे गर्दी झाली होती. दरम्यान काही प्रवासी शौचालयात जाण्यासाठी थांबले होते. बराच वेळ होऊनही शौचालयाचा दरवाजा उघडला नाही. प्रवाशांनी आवाज उठवला तर आतून काहीच प्रतिसाद आला नाही. त्यामुळे काही प्रवाशांनी रेल्वे पोलीस आणि रेल्वे सुरक्षा दलाला फोन केला.
रेल्वे सुरक्षा कर्मचार्यांनी टॉयलेटचा दरवाजा तोडला आणि एक व्यक्ती मृत दिसली. त्याच्याकडे सापडलेल्या आधारकार्डवरून त्याची ओळख पटली आहे. त्याच्याकडे आधार कार्ड आणि रेल्वे तिकीट आढळली. रामसेवक भुहिया असे त्यांचे नाव असून त्यांचे वय ३८ वर्षे आहे. तर तो बिहारमधील औरंगाबादचा रहिवासी आहे. लोहमार्ग पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी इंदिरा गांधी शासकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात पाठवला.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…