निफाड तालुक्यात असलेल्या पालखेड मिरचीचे येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे तरुण शेतकरी मनोज भगीरथ जगझाप (वय ३७) याने आर्थिक विवंचनेतून विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेला सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
द्राक्षबागेसह व इतर पिकांच्या कोसळलेल्या भावामुळे आर्थिक देवाणघेवाण पूर्ण होऊ शकली नाही. त्यात एका बँकेकडून घेतलेल्या कर्जाच्या फेडीसाठी तगादे वाढल्याने त्यांनी हात उसने व नातेवाईंकाकडून पैसे घेऊन बँकेचे कर्ज नुकतेच भरले होते. पुन्हा याच बँकेकडून कर्ज घेऊन ज्यांच्याकडून पैसे घेतले त्यांचे परत देऊ असे नियोजन असताना या शेतकऱ्याला बँकेने कर्ज देण्याचा नकार दिल्याने या शेतकऱ्याने धक्कादायक पाऊल उचलल्याची चर्चा सुरू आहे. कर्ज नाकारल्याचा धक्का मनोजला सहन झाला नाही.
दरम्यान, ज्यांच्याकडून पैसे घेतले होते, त्यांची परतफेड कशी करायची या विवंचनेत असताना काल दिनांक १६ रोजी सकाळी अकराच्या सुमारास आपला मोबाईल, महत्वाची कागदपत्रे असलेले पाकिट विहिरीतील पेटीत ठेवले व पोटाला दगड बांधून विहिरीत उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. घरातील सदस्यांनी सगळीकडे शोधाशोध घेऊनही संपर्क होत नव्हता. काही वेळातच विहिरीलगत चपला दिसून आल्या.
विहिरीतील पाण्यात शोध घेतला असता मनोजचा मृतदेह विहिरीत आढळून आला. तो काढून पिंपळगावाच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. पिंपळगाव बसवंत पोलिस ठाण्यात याबाबत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पिंपळगाव पोलीस करीत आहेत.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…