‘यंदा नैर्ऋत्य मान्सून चार जून रोजी केरळमध्ये दाखल होऊ शकतो,’ असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) मंगळवारी जाहीर केला. केरळमध्ये मान्सून दाखल होण्याची सर्वसाधारण तारीख एक जून आहे. त्या तुलनेत तीन दिवस उशिरा मान्सून केरळमध्ये दाखल होऊ शकतो. सध्या दक्षिण हिंदी महासागरात सक्रिय असलेल्या ‘फॅबियन’ चक्रीवादळाच्या प्रभावामुळे अरबी समुद्रात मोसमी वाऱ्यांचा प्रवाह सक्रिय होण्यास थोडा विलंब होऊ शकतो, असे हवामानतज्ज्ञांचे म्हणणे आहे.
मेडन ज्युलियन ऑस्सिलेशन (एमजेओ) उष्णकटिबंधीय प्रदेशात पूर्वेच्या दिशेने सरकणारे ढगांचे क्षेत्र सध्या भारतासाठी प्रतिकूल स्थितीत असून, जूनच्या पहिल्या आठवड्यात हे क्षेत्र पुन्हा भारतासाठी अनुकूल स्थितीत येण्याची शक्यता ‘हवामानशास्त्रीय मॉडेल’ वर्तवत आहेत. दक्षिण गोलार्धातून विषुववृत्त ओलांडून भारतीय उपखंडावर येणारा मोसमी वाऱ्यांचा प्रवाह (क्रॉस इक्विटोरियल फ्लो) मे अखेरीस अरबी समुद्रावर सक्रिय होतानाच ‘एमजेओ’ हे ढगांचे क्षेत्रही त्याच काळात हिंदी महासागरावर येण्याची शक्यता असल्याने जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सून अरबी समुद्रासह केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेटिओरोलॉजी’च्या (आयआयटीएम) विस्तारित अंदाजामधून वर्तवण्यात आली आहे.
‘आयएमडी’तर्फे २००५ पासून मान्सूनच्या केरळमधील आगमनाच्या तारखेचा अंदाज देण्यात येतो. त्यासाठी सहा घटकांचा समावेश असलेल्या सांख्यिकी मॉडेलचा आधार घेतला जातो. २०१५ हे वर्ष सोडता इतर सर्व वर्षांमध्ये आयएमडीचा केरळमधील मान्सूनच्या आगमनाच्या तारखेचा अंदाज हा त्रुटीच्या मर्यादेत राहिला असल्याचे ‘आयएमडी’चे म्हणणे आहे.
‘मोखा’ चक्रीवादळाचा प्रभाव ओसरत असताना बंगालच्या उपसागरात मान्सूनच्या वाऱ्यांचा प्रवाह सध्या सक्रिय होत आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत मान्सून बंगालच्या उपसागराचा दक्षिण भाग, दक्षिण अंदमानचा समुद्र आणि निकोबार बेटांवर दाखल होऊ शकतो, असा अंदाज ‘आयएमडी’ने वर्तवला आहे. मान्सून अंदमानात दाखल होण्याची सर्वसाधारण तारीख २२ मे आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…