गुजरातमधील अमरेली जिल्ह्यात हृदयविकाराच्या झटक्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला. त्यामुळे घरात गोंधळ उडाला. अंत्यसंस्काराची तयारी सुरु होती. दरम्यान, घरातील आणखी एका मृत्यूने कुटुंबीयावर दु:खाचा डोंगर कोसळला. मुलावर अजून अंत्यसंस्कार झाले नव्हते आणि तिकडे सुनेनेही मृत्यूला कवटाळले. आत्महत्येच्या या घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
हृदयद्रावक घटना अमरेली जिल्ह्यातील लिलीया गावातील आहे. येथे धवल राठोड यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. तरुण पोराचा मृत्यू झाल्याने आधीच घरात शोकाकूल वातावरण होते. दरम्यान, नातेवाईकांना याची माहिती देण्यात आली आणि अंत्यविधीची तयारी सुरू झाली. आजूबाजूचे लोकही धवलच्या घरी जमू लागले.
दरम्यान, धवलची पत्नी प्रिन्सी हिने गळफास लावून आत्महत्या केली. दोघांनी ६ महिन्यांपूर्वी प्रेमविवाह केला होता. मुलाच्या मृत्यूनंतर सुनेने उचललेल्या या पावलामुळे कुटुंबातच नव्हे तर संपूर्ण गावात खळबळ उडाली. अचानक घरात दोन मृत्यू झाल्याने साऱ्यांनाच शॉक लागला. बराच कोणाला विश्वासच बसत नव्हता की आता मुलासोबत सुनेच्याही अंत्यसंस्काराची तयारी करावी लागणार आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…