जालना शहराच्या टीव्ही सेंटर भागातील ४० वर्षीय प्रमोद झिने यांचा ७ मे रोजी सकाळी निर्घृणपणे खून करण्यात आला होता. याप्रकरणात मयताची पत्नी आशा झिने हिने केलेल्या तक्रारीवरुन त्याच भागातील एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या अनुषंगाने पोलिसांनी तत्काळ पावले उचलत संबंधित महिलेला अटकही केली होती. आशा हिने दिलेल्या तक्रारीत प्रमोद झिने याचे त्या महिलेसोबत अनैतिक संबंध होते. त्यातूनच त्या महिलेने प्रमोद याचा खून केल्याचं तिने तक्रारीत म्हटले होते.
दरम्यान, प्रमोद झिने यांच्या खून प्रकरणातील खऱ्या आरोपीचा पर्दाफाश करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुभाष भुजंग यांनी या गुन्ह्यातील खऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.
मृत प्रमोद झिने यांची पत्नी आशाचे रेवगाव येथील रुपेश योहानराव शिंदे यांच्यासोबत अनैतिक संबंध होते. त्यांच्या अनैतिक संबंधात प्रमोद याचा अडसर होऊ लागल्याने अशा झिने आणि रुपेश शिंदे यांनी गेल्या महिन्यातच प्रमोद याच्या खुनाचा कट रचला होता. ६ मे च्या रात्री प्रमोद मद्यप्राशन करून झोपले आसल्याची संधी चालून येताच आशा हिने तिचा प्रियकर रुपेश शिंदे यास बोलावून घेतले.
प्रमोद यांचा झोपेतच डोक्यावर, मानेवर, कानावर तसेच शरीरावर धारदार शस्त्राने वार करून खून केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. पोलिस अधीक्षकांच्या निवासस्थानापासून हाकेच्या अंतरावर झालेल्या या खुनाने टिव्ही सेंटर परिसरात खळबळ माजली होती. स्थानिक गुन्हे शाखेने मयताची पत्नी आशा झिने आणि तिचा प्रियकर रुपेश शिंदे या दोघांना ताब्यात घेऊन तालुका जालना पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. पोलिस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे, अप्पर पोलीस अधीक्षक राहुल खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग यांच्यासह पथकाने या खुनातील खऱ्या आरोपीचा छडा लावला आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…