Categories: Uncategorized

पंढरीतील दिवंगत समाजसेवक राजाराम नाईकनवरे यांच्या द्वितीय पुण्यस्मरण दिनानिमित्त विविध सामाजिक व धार्मिक उपक्रम संपन्न

पंढरीतील दिवंगत समाजसेवक (कै.) राजाराम महादेव नाईकनवरे यांच्या द्वितीय पुण्यस्मरण दिनानिमित्त दि. 10 मे 2023 रोजी विविध सामाजिक व धार्मिक उपक्रम राबविण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी (कै.)राजाराम नाईकनवरे यांना आदरांजली वाहून त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.

गोपाळपूर येथील मातोश्री वृध्दाश्रम येथे श्रीमती कमल महादेव नाईकनवरे व श्रीमती सुनंदा राजाराम नाईकनवरे यांच्या हस्ते मिष्ठान्न भोजन देण्यात आले. तसेच नाईकनवरे यांच्या निवासस्थानी भजन किर्तन व इतर सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कॅप्टन प्रदीपकुमार मोरे, माजी पालकमंत्री लक्ष्मणराव ढोबळे, युवानेते भगिरथ भालके, विठ्ठल साखर कारखान्याचे संचालक अमर पाटील, शिक्षणाधिकारी बिभीषण रणदिवे, नगरसेवक कृष्णा वाघमारे, राजु सर्वगोड, संजय निंबाळकर, महेश साठे, अंबादास वायदंडे, किर्तीपाल सर्वगोड, बादल यादव, किशोर खिलारे, शैलेश आगावणे, ह.भ.प. फड महाराज, उमेश सर्वगोड, पांढरे, ईस्माईलभाई बोहरी, रामेश्‍वर सातपुते, उमेश अधटराव, जोशाबा टाईम्स चे संपादक श्रीकांत कसबे, आण्णा धोत्रे, संजय अडगळे, दत्ता खिलारे, धनंजय खिलारे, चंद्रकांत खिलारे, लक्ष्मण रणदिवे, सागर नाईकनवरे, सुधीर रणदिवे, गणेश नाईकनवरे आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
(कै.) राजाराम नाईकनवरे हे पंढरपूर शहर व तालुक्यासह सर्वत्र दादा या नावाने ओळखले जात. त्यांनी महाराष्ट्र राज्य वीज कामगार संघटनेचे (इंटक) महाराष्ट्राचे उपाध्यक्ष व शिवशंकर वीज कामगार मंडळाचे दोनवेळा चेअरमनपद भुषवले होते. तसेच पंढरपूर तालुक्यातील एक कर्तव्यदक्ष लाईनमन म्हणून काम करत असताना त्यांनी सामाजिक क्षेत्रातही उल्लेखनीय कार्य केले होते. तळागाळातील सर्वसामान्यांच्या, गोरगरीबांच्या, कामगारांच्या सुख-दु:खात ते नेहमीच सहभागी होत असत. दादांची इच्छा होती की, आपल्या दोन मुलापैकी एक मुलगा देशसेवेसाठी भारतीय सैन्यदलात पाठवावा व दुसरा मुलगा समाजातील विविध प्रश्‍न सोडविण्यासाठी कटीबध्द राहून समाजसेवेत सक्रीय असावा. त्यानुसार त्यांचे थोरले चिरंजीव विक्रम राजाराम नाईकनवरे हे भारतीय सैन्यदलात सेवेत आहेत. तसेच दुसरे चिरंजीव दिपक राजाराम नाईकनवरे हे एक प्रसिध्द कलाकार म्हणून ओळखले जातात, त्याचसोबत ते शहर व परिसरातील विविध सामाजिक कार्यात हिरीरिने सहभागी असतात.

दादांच्या द्वितीय पुण्यस्मरण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना माजी पालकमंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी दादांच्या आयुष्यातील कांही अनुभवांचा उल्लख केला. ते म्हणाले की, दादांनी तळागाळातील लोकांना न्याय देण्याचं काम इंटकच्या माध्यमातुन केले. तसेच समाजातील तळागाळातील लोकांना मुख्य प्रवाहात आणत त्यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. ते नुसते बोलत नसत तर आपल्या कृतीतून कार्य करुन दाखवत असत. यावेळी सर्वच प्रमुख मान्यवरांनी दादांच्या आठवणींना उजाळा दिला.
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग चा ९२%निकाल

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांच्या कडून घेण्यात आलेल्या बी.एस्सी नर्सिंगच्या हिवाळी २०२५ परीक्षेत कर्मयोगी…

2 weeks ago

१९ एप्रिल रोजी शिवस्वराज्य पंढरीरत्न राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार सोहळ्याचे आयोजन

पंढरपूर येथे आयोजीत पुरस्कार वितरण सोहळा या मान्यवरांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.या…

3 weeks ago

मा.आ.प्रशांत परिचारक यांना विधान परिषद नाही तर विधानसभेचे आमदार करण्यासाठी भाजपचे वरिष्ठ आग्रही ?

सोलापूर जिल्ह्यातून विधान परिषदेसाठी राम सातपुते,बाळराजे पाटील यांचे नाव आघाडीवर  परिचारक यांनी तिरंगी लढतीत दोन पराभव…

3 weeks ago

भावनिक क्षणांत रंगला सिंहगडमध्ये अंतिम वर्षाचा निरोप समारंभ

एस के एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपुर येथील सिव्हिल इंजिनिअरिंग विभाग व सिव्हिल इंजिनिअरिंग…

4 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये निर्भया पथकाचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पंढरपूर येथे दिनांक ४ एप्रिल २०२६ रोजी…

1 month ago

कर्मयोगी विद्यानिकेतनचे अभिमानास्पद यश!

पंढरपूर : श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर शाळेचा इयत्ता चौथीतील विद्यार्थी पियुष पोपट…

1 month ago