दारू पिण्यासाठी पैसे देण्यास नकार देणाऱ्या आईवर मुलाने हल्ला करून जखमी केल्याची धक्कादायक घटना नंदुरबार जिल्ह्यात घडली आहे. या घटनेत मुला बरोबर त्याच्या मामेभावाने देखील या महिलेवर हल्ला केला असून तिला जखमी केल्याची घटना तळोदा तालुक्यातुन समोर आली आहे. या प्रकरणी जखमी आईने मुलगा आणि भाचा या दोघांविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नंदुरबार जिल्ह्याच्या तळोदा तालुक्यातील धजापाणी येथे गुरुवारी मुलाने आईला जखमी केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. जेरमीबाई बारक्या वळवी असे वृद्ध महिलेचे नाव आहे. ६५ वर्षीय वृद्ध महिला तळोद्याच्या धजापाणी येथील रहिवासी आहे. गुरुवारी रात्री या महिलेकडे तिच्या मुलाने दारू पिण्यासाठी पैसे मागितले असता तिने पैसे देण्यास नकार दिला. त्यानंतर मुलाने आणि भाच्याने मिळून या मातेला जखमी केले. तिचा मुलगा २५ वर्षीय दयानंद बारक्या वळवी याच्यासोबत त्याचा मामेभाऊ श्रावण लेहऱ्या वळवी हा गुरुवारी रात्री घरी आला होता.
मुलगा दयानंद याने दारू पिण्यासाठी पैश्यांची मागणी केली परंतु जेरमीबाई यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने भाचा श्रावण याने लाकडी काठीने त्यांना बेदम मारहाण केली त्यावेळी सोबत असलेला मुलगा दयानंदने आईला शिवीगाळ करत जीवेठार मारण्याची धमकी दिली. हा धक्कादायक प्रकार ग्रामस्थांच्या समोर आल्यानंतर त्यांनी मध्यस्थी केल्यानंतर दोघेही घटनास्थळा वरून निघून गेले.
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…
पंढरपूर–‘करिअर करत असताना अपयश आले तरी हरकत नाही, परंतू प्रयत्न मात्र सोडू नयेत. इंजिनिअरिंग पूर्ण…
श्री. पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अभियांत्रिकी महाविद्यालयातील तृतीय वर्षा मध्ये शिकत असणार्या…