ताज्याघडामोडी

धुमधडाक्यात लग्न, दुसऱ्याच दिवशी नववधू खोलीतून ओरडत बाहेर आली, सत्य कळताच लग्नघरी सन्नाटा…

मोठ्या धाटामाटात लग्न झालं. सुनेला घरी आणलं. पण, सासरच्या घरी येताच नववधूने गोंधळ घातला. वराच्या खोलीतून ती आरडाओरड करत बाहेर पडली आणि गोंधळ घालू लागली. काय झालंय, नववधू अशी का वागतेय कोणालाच काही कळालं नाही. अखेर तिच्या घरच्यांना बोलावण्यात आलं. त्यानंतर जे सत्य कळालं त्याने सासरच्यांच्या पायाखालची जमीनच सरकली.

वृंदावनमध्ये ही विचित्र घटना घडली आहे. जिल्ह्यातील गौरा नगर येथील रहिवासी असलेल्या आनंद अग्रवाल यांचे लग्न हरियाणातील होडल येथील रहिवासी लखन पाल मंगला यांची मुलगी रेखासोबत निश्चित झालं होतं. १० मे रोजी लग्नाची तारीख ठरली. ठरलेल्या तारखेला आणि वेळेत दोघांनीही मोठ्या थाटामाटात लग्न केले.

११ मे रोजी सकाळी रेखाला घेऊन सासरच्या घरी पोहोचली आणि तिथे गोंधळ घालू लागला. तिने विचित्रपणे वागण्यास सुरुवात केली. काही वेळातच संपूर्ण परिसरात चर्चा होऊ लागली. त्यानंतर वरपक्षाने तात्काळ वधूच्या नातेवाईकांना बोलावलं. मात्र, प्रकरण काही शांत झालं नाही. त्यानंतर वराच्या नातेवाईकांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली.

पती आनंदने सांगितले की, खोलीतून बाहेर पडल्यानंतर पत्नी रेखाने घरातील सदस्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. ती वेड्यासारखी वागू लागली. आता पती आनंदने नववधूच्या घरच्यांवर सत्य लपवून फसवणूक करत लग्न लावून दिल्याचा आरोप केला आहे. वधू ही मतिमंद असल्याचं घरच्यांनी लपवल्याचं त्याने म्हटलं.

त्यानंतर सासरच्या मंडळींनी नवविवाहितेचा भाऊ विनोद याला फोन करून सर्व प्रकार सांगितला. यानंतर रेखाच्या भावाने जे सत्या सांगितलं ते ऐकून साऱ्यांना धक्का बसला. लग्नघरात भयान शांतता पसरली. काही वेळापूर्वी जिथे आनंद साजरा केला जात होता, तिथे आता दु:खाचं वातावरण पसरलं होतं.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

4 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

4 weeks ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago

कर्मयोगीच्या तब्बल ११० विद्यार्थ्यांची झेंसार कंपनी मध्ये निवड.

श्री. पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अभियांत्रिकी महाविद्यालयातील तृतीय वर्षा मध्ये शिकत असणार्‍या…

1 month ago