ताज्याघडामोडी

फोन पेवर पैसे पाठवताना २ ऐवजी ३ नंबर दाबला; एकाने घेतला महिलेचा गैरफायदा, महिला हादरली

फोन पेद्वारे पैसे पाठवताना चुकीचा नंबर टाइप केल्यानंतर एका महिलेला मोठा मानसिक त्रास सहन करावा लागला. ही घटना वेदांत नगर येथे घडली. पीडित महिलेने ज्वेलर्स दुकानदाराचे पैसे फोन पे द्वारे पाठवले. मात्र मोबाईल क्रमांक टाईप करतांना २ ऐवजी ३ नंबर दबला. चुकून पैसे दुसऱ्या नंबर वर गेले. सराफा दुकानदाराला ही बाब सांगितल्यानंतर त्याने त्याचा मित्राचा नंबर दिला.

ज्वेलर्स दुकानदार च्या मित्राने याचा गैरफायदा घेत महिलेला पैसे काढून देत तो म्हणत व्हिडिओ कॉल करायला सुरुवात केली. तू तुझ्या मुलाबाळांना सोडून माझ्याकडे ये, मी शिक्षक आहे. माझ्याकडे खूप पैसा आहे म्हणून अश्लील भाषेत संवाद साधत महिलेला त्रास दीला.दरम्यान घाबरलेल्या महिलेने कंटाळून आरोपी विरोधात वेदांत नगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला आहे.

योगेश पाटील (रा.चाळीसगाव) असे आरोपीचे नाव आहे. दरम्यान या प्रकरणी पीडितेने वेदानगर पोलीस ठाण्यामध्ये दिलेल्या फिर्यादीनुसार, पीडित महिला वेदांत नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये कुटुंबीयांसोबत राहते. शहरातील एका ज्वेलर दुकानदारांसोबत त्या महिलेचा व्यवहार झाला महिलेला ज्वेलर्स दुकानदाराला ७,१५० रुपये ऑनलाईन पाठवायचे होते. यामुळे महिलेने फोन पे द्वारे ज्वेलर्स दुकानदाराला पैसे पाठवले.

मात्र पैसे पाठवताना महिलेकडून ज्वेलर्स दुकानदाराचा नंबर दोन ऐवजी तीन असा चुकून दबला आणि त्यामुळे पैसे दुसऱ्या व्यक्तीला गेले. ही बाब महिलेच्या लक्षात येताच महिलेने बँकेची संवाद साधला त्यावेळेला बाबू ननवरे (रा. चाळीसगाव) या व्यक्तीच्या खात्यामध्ये गेल्याचं लक्षात आलं. दरम्यान ही बाब त्या महिलेने ज्वेलरी दुकानदाराला सांगितली. ज्वेलरी दुकानदाराने महिलेला चाळीसगाव येथील योगेश पाटील नावाच्या मित्राचा नंबर दिला.

ज्वेलर्स दुकानदार व्यक्तीच्या चाळीसगाव येथील ओळखीच्या व्यक्तीचा नंबर मिळाल्यामुळे महिलेने संबंधित व्यक्तीला घडलेला सगळा घटनाक्रम सांगितला. त्यानंतर योगेश पाटील यांनी मी पैसे काढून देतो असं महिलेला सांगितलं. महिलेने पैसे मिळवून देण्यासाठी फोन केल्याचा गैरफायदा घेत योगेश आणि महिलेची लगट करण्याचा प्रयत्न केला. तो महिलेला वारंवार व्हिडिओ कॉल करत असे, तसेच मुलीशी अश्लील संवाद साधत होता.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

4 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago

कर्मयोगीच्या तब्बल ११० विद्यार्थ्यांची झेंसार कंपनी मध्ये निवड.

श्री. पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अभियांत्रिकी महाविद्यालयातील तृतीय वर्षा मध्ये शिकत असणार्‍या…

1 month ago