केरळच्या कोल्लम जिल्ह्यातील कोट्टाराकार तालुक्यातील धक्कादायक घटना घडली आहे. एका रुग्णालयात रुग्णानं महिला डॉक्टरवर कात्रीनं हल्ला करुन तिचा जीव घेतला. पोलिसांनी रुग्णाला उपचारांसाठी रुग्णालयात नेलं होतं. बुधवारी सकाळीच्या सुमारास ही घटना घडली. वंदना दास असं हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या डॉक्टरचं नाव आहे. त्या केरळच्या कोट्टायमची रहिवासी होत्या. २३ वर्षांच्या वंदना हाऊस सर्जन म्हणून कार्यरत होत्या.
संदीप नेदुमपारा असं आरोपीचं नाव असून तो पेशानं शिक्षक आहे. त्याचं कुटुंबातील काहींशी वाद झाला. प्रकरण हाणामारीपर्यंत गेलं. त्यात संदीप जखमी झाला. त्यानंतर त्याला कोट्टाराकारामधील रुग्णालयात आणण्यात आलं. पहाटे चारच्या सुमारास त्याला रुग्णालयात नेण्यात आलं होतं. डॉक्टर त्याच्या जखमेवर मलमपट्टी करत होते. तेव्हा संदीपनं तिथेच असलेल्या कात्रीनं डॉक्टरांवर हल्ला केला. त्यानं डॉ. वंदना यांना कात्रीनं भोसकलं. संदीपनं चढवलेल्या हल्ल्यात डॉक्टरांसह पाच जण जखमी झाले. त्यात पोलीस कर्मचाऱ्याचाही समावेश आहे.
हल्ल्यानंतर डॉक्टरांना तिरुअनंतपुरममधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. यानंतर इंडियन मेडिकल असोसिएशननं आक्रमक भूमिका घेत राज्यभरात कामबंद आंदोलनाची हाक दिली. डॉक्टरांच्या मृत्यूनंतर मुख्यमंत्री पिनराई विजयन आणि राज्यपाल आरिफ मोहम्मद खान रुग्णालयात पोहोचले. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले.
प्लेसमेंटच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यविकासासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचा पुढाकार सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर…
शैक्षणिक संस्थांचा पाठिंबा; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला सातारा : पुणे विभाग…
NEP २०२०च्या नावाखाली प्राध्यापकांची पदे कमी होऊ देणार नाही; आश्रमशाळांच्या सुधारणांसाठी कटिबद्ध! पुणे : राष्ट्रीय…
गृहभेटी, दूरध्वनी संपर्क आणि वैयक्तिक संवादातून शिक्षक मतदारांपर्यंत पोहोचण्यावर भर सातारा : पुणे विभाग…
ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर विजयी होणार सांगोला– राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर…
ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर १०० टक्के विजयी होणार मिरज – राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक…