ताज्याघडामोडी

झोपेतून उठला, पळत सुटला, तिसऱ्या मजल्यावरुन पडला; पत्नीसोबत रुग्णालयात गेलेल्या तरुणाचा अंत

मध्य प्रदेशच्या खंडवामध्ये सोमवारी सकाळी तिसऱ्या मजल्यावरून पडून तरुणाचा मृत्यू झाला आहे. तिसऱ्या मजल्यावर झोपलेल्या तरुणावर मधमाशांनी हल्ला केला. मधमाशांपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी तरुण पळत सुटला. गडबडीत त्यानं तिसऱ्या मजल्यावरुन खाली उडी टाकली. त्याच्या डोक्याला गंभीर स्वरुपाची इजा झाली. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना दुर्दैवी असल्याचं म्हणत जिल्हा मुख्य आरोग्य अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. मधमाशांचं पोळं हटवण्याच्या सूचना त्यांनी केल्या आहेत.

वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठात्यांनी रात्रीची सीसीटीव्ही फुटेज पाहून मधमाशांच्या हल्ल्याचा दावा फेटाळून लावला. रात्रीच्या सुमारास मृत तरुण आणि कुटुंबीयांचा वाद झाल्याची माहिती समोर आली आहे. त्याच्या आधारे हे प्रकरण आत्महत्येचं असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रुग्णालयात घडलेलं प्रकरण संशयास्पद समजलं जात आहे.

रामपुरा गावात वास्तव्यास असलेला सचिन त्याच्या गर्भवती पत्नीला घेऊन प्रसुतीसाठी जिल्हा रुग्णालयात आला होता. रविवारी त्याच्या पत्नीनं मुलाला जन्म दिला. रात्रीच्या सुमारास सचिन रुग्णालयाच्या व्हरांड्यात झोपला होता. त्यावेळी त्याला अचानक काहीतरी चावलं. यानंतर सचिननं घाबरुन तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारली. तरुणाच्या मृत्यूला रुग्णालय व्यवस्थापन जबाबदार असल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला. मधमाशांचं पोळं वेळीच हटवलं गेलं असतं तर हा प्रकार घडला नसता, असा दावा सचिनच्या कुटुंबानं केला.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

16 hours ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

2 days ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago