सिगारेट पेटवण्यासाठी माचिस देण्यास नकार दिल्याने दोन अल्पवयीन मुलांनी २२ वर्षीय तरुणाचा चाकूने वार करून निर्घृण खून केला आहे. आरोपींविरुद्ध तक्रार नोंदवल्यानंतर मुंबई पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. ही दोन्ही मुलं १५ आणि १६ वर्षांची असल्याची माहिती आहे. मुंबईतील मानखुर्दमध्ये रविवारी रात्री उशीरा ही खळबळजनक घटना घडली तर सोमवारी सकाळी ती उघडकीस आली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रमजान अब्दुल हमीद शेख असे मृताचे नाव असून तो मानखुर्द येथील रहिवासी होता. तो कचऱ्यातून प्लास्टिक आणि निरुपयोगी वस्तू जमा करण्याचं काम करत असत. त्याच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी दोन्ही अल्पवयीन मुलांनाही अटक करण्यात आली आहे. रमजानने अल्पवयीन मुलांना सिगारेट पेटवायला माचिस देण्यास नकार दिल्याचे सांगितले जात आहे. तसेच, त्याने या मुलांना त्यांचं सिगारेट ओढण्याचं वय नाही असं म्हटलं. तसेच, त्यांना शिवीगाळही केली. त्यानंतर रमजान आणि या मुलांमधील वाद इतका वाढला की त्यांनी रमजानचा चाकूने भोसकून खून केला.
रमजान शेख मानखुर्द येथे राहत होता, तर त्याचे आई-वडील मुंब्रा येथे राहतात. सोमवारी सकाळी साडे सहा वाजताच्या सुमारास स्थानिक लोकांनी शेख यांना रक्ताच्या थारोळ्यात पडलेले पाहिले, तेव्हा ही घटना उघडकीस आली. माहिती मिळताच मानखुर्द पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी शेख यांना घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात नेले. मात्र तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…