ताज्याघडामोडी

वडील, काका, दोन भाऊ, संपूर्ण कुटुंबच झालं हैवान; दत्तक मुलीसोबत सुरू होता भयंकर प्रकार

१३ वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार करण्याच्या आरोपाखाली ५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरुन आरोपीला दत्तक घेणारे वडिल आणि भावासह अन्य तीन जणांनी मिळून तिच्यावर अत्याचार केले. पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले असून घटनेची कसून चौकशी करण्यात येत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी सहा महिन्यांची असताना तिला या कुटुंबाने अनाथ आश्रमातून दत्तक घेतले होते. तिच्या पालनपोषणाची जबाबदारी त्यांनी घेतली होती. मात्र, जस जस तिचे वय वाढत गेले तसे तिच्या वडिलासंह, काका, दोन भाऊ आणि अन्य एका युवकाने तिच्यावर अत्याचार करण्यास सुरुवात केली. कित्येक वर्षांपासून ते तिच्यावर जबरदस्ती करत होते.

पीडित तरुणीला त्रास असह्य झाल्यानंतर अखेर तिने याबाबत तक्रार केली. अडाजन पोलिस ठाण्यात अल्पवयीन मुलीने तक्रार दाखल केली आहे. पीडितेसोबत घडलेले प्रकार ऐकून पोलिसही सून्न झाले. तातडीने कारवाई करत पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले आहे.

सूरतचे एसीपी बी. एम. चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे प्रकरण गंभीर असून चार जणांना ताब्यात घेतले आहे. यात एक अल्पवयीन आरोपीदेखील आहे. सगळ्यांची चौकशी सुरू आहे. या प्रकरणी पुढील कारवाई करण्यात येत आहे. जे काही तथ्य समोर येतील त्याआधारे पुढील तपास करण्यात येईल. तसंच, अल्पवयीन मुलीची मेडिकल चाचणीही करण्यात येईल.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

17 hours ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

2 days ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago