एका पतीने आपल्या पत्नीसोबत असं भयंकर कृत्य केलं आहे ज्याचा तुम्ही स्वप्नातही विचार करु शकत नाही. उत्तर प्रदेशातील रामपूरमध्ये एका खळबळजनक घटना घडली आहे. येथे एका तरुणाने पत्नीची निर्घृणपणे हत्या केली आणि त्यानंतर त्याने तिचे डोळे फोडले. पत्नीची हत्या केल्यानंतर त्याने स्वत:ही आत्महत्या केली. या घटनेने कुटुंबावर शोककळा पसरली आहे. या दोघांमध्ये वाद सुरु असून त्यातूनच ही घटना घडल्याचं सांगितलं जात आहे.
रामपूरमध्ये शाहजेब पत्नी शहाना आणि दोन मुलांसह राहत होता. दोघांचं लग्न ६ वर्षांपूर्वी झालं असून त्यांना दोन मुलं आहेत. त्याचा प्रेमविवाह झाला होता. शाहजेब शुक्रवारीच पत्नीला तिच्या माहेरून घेऊन आला होता. शनिवारी सकाळी ११ ते १२ वाजेच्या दरम्यान शाहजेबचा त्याची पत्नी शहानासोबत काही गोष्टींवरुन जोरदार वाद झाला.
दोघांमधील भांडण इतकं वाढलं की शाहजेबने बर्फ तोडणाऱ्या शस्त्राने पत्नीवर हल्ला केला. त्याने तिच्या चेहऱ्यापासून शरीराच्या इतर भागावर एकामागून एक अनेकवेळा वार केले. यादरम्यान, हे शस्त्र शहानाच्या डोळ्यात गेली आणि तिचे डोळे फुटून बाहेर पडले. पत्नीची हत्या केल्यानंतर त्याच शस्त्राने शाहजेबने स्वत:वरही वार केले.
आरडाओरडा ऐकून शेजारी शाहजेबच्या घरी पोहोचले तेव्हा घरातील परिस्थिती पाहून त्यांच्या अंगावर काटा आला. शाहजेबचा मृत्यू झालेला नव्हता तो जिवंत होता. त्यामुळे त्याला रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र, रुग्णालयात पोहोचताच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठलं. घटनास्थळी फॉरेन्सिक टीमलाही पाचारण करण्यात आले. पुरावे गोळा केले. यासोबतच पोलिसांनी आजूबाजूच्या लोकांकडून माहिती घेतली. या प्रकरणाची माहिती देताना सीओ सिटी अनुज चौधरी यांनी सांगितले की, शाहजेब आणि शहाना यांचा ६ वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. दोघांना दोन मुलंही आहेत.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…