शरद पवार यांनी घेतलेला निवृत्तीचा निर्णय आज मागे घेतला. त्यांच्या भूमिकांचे अनेक अर्थ काढले जात आहेत. विशेषतः अजित पवारांच्या भाजप प्रवेशाच्या वावड्यांना ब्रेक लागावा, यासाठी पवारांनी खेळी केल्याचंही बोललं जातंय.त्यातच आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एक विधान केल्याचे खळबळ उडाली आहे. ‘झी २४ तास’ला दिलेल्या मुलाखतीत जयंत पाटील यांना एक विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना त्यांनी भाजपमध्ये जाणारे मर्यादित असतील, असं म्हटलं आहे.
अनेकांना भाजपमध्ये जायचं आहे, असं पवारांनीच पुस्तकात लिहिलं आहे आणि आता त्यांनी निवृत्तीचा निर्णय घेतला याचा अर्थ तुम्हाला जे करायचंय ते करा; असं पवारांना सूचित करायचं आहे का? असा प्रश्न जयंत पाटलांना विचारण्यात आला.जयंत पाटील उत्तर देतांना म्हणाले की, भाजपसोबत जाण्याचा विचार करणारे काही लोक पक्षात असू शकतात. परंतु त्यांची संख्या मर्यादित असेल. मात्र माझ्यासमोर अशा भूमिका कुणीही व्यक्त केलेल्या नाहीत.
ते पुढे म्हणाले की, राष्ट्रवादीला आज राज्यात विस्तारण्याची संधी आहे. महाविकास आघाडीच्या प्रयोगाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. महाविकास आघाडी ब्रेक व्हावी, असं कुणाला वाटत असेल तर त्यांना रोखण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. असं विधान जयंत पाटील यांनी केलं आहे.
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…