मालेगाव तालुक्यातील मेडशी येथे शेत जमीन व जागेच्या वादातून पुतण्याने आपल्या ८४ वर्षीय म्हाताऱ्या काकाचा खून केल्याची घटना दिनांक ४ मे रोजी रात्री पावणे बारा वाजताच्या सुमारास उघडकीस आली असून पोलिसांनी आरोपीला आज अटक केली असता त्याला ८ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार धर्माजी आनंदा तायडे (८४) व आरोपी पुतण्या रत्नदीप तायडे यांचे ४ मे रोजी सकाळी जागेवरून व शेताच्या जमिनीवरून घरी वाद झाले. त्यानंतर धर्मा आनंदा तायडे हे शेतामध्ये निघून गेले. रात्री दहा वाजता पर्यंत धर्माजी तायडे घरी न आल्यामुळे घरच्यांनी पोलीस चौकी गाठली आणि पोलिसांना सकाळी घडलेल्या घटनेची माहिती दिली.
ते घरी आले नाहीत यावरून पोलिस हेड कॉन्स्टेबल गजानन पांचाळ, राजू बंगाले, नापोका सुखनंदन तांबारे, पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर सानप यांनीशेतामध्ये जाऊन धर्माजी यांचा शोध घेतला असता ते बेशुद्ध अवस्थेत त्यांना आढळून आले. त्यांच्या डोक्यावर मार लागलेला होता व चेहरा रक्ताने माखलेला होता. जवळ जाऊन हृदयाचे ठोके व नाडी तपासली असता ते मृत झाल्याचे लक्षात आले.
मृताच्या घरच्या मंडळीने दिलेल्या माहिती वरून पोलिसांनी आरोपी पुतण्या रत्नदीप नाथूराम तायडे (३५) याला ताब्यात घेतले. त्याला पोलिसी खाक्या दाखवला असता रागाच्या भरात आपणच काकांचा खून केल्याची कबुली पुतण्याने दिली आहे. आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याला ८तारखे पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…