शरद पवार यांनी शुक्रवारी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेत असल्याचे जाहीर केले आहे. या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे काही नवीन चेहरे समोर आले आहेत. यात आमदार रोहित पवार, आमदार संदीप क्षीरसागर, राष्ट्रवादीच्या युवती महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया दुहान, तसेच आमदार संग्राम जगताप हे नवीन यंग चेहरे या पत्रकार परिषदेत शरद पवार यांच्या मागे बसलेले दिसून आले आहेत.
शरद पवारांच्या आजच्या पत्रकार परिषदेत आमदार रोहित पवार, आमदार संदीप क्षीरसागर, संग्राम जगताप, संजय बनसोडे तसेच सोनिया दूहान या त्यांच्या मागे बसल्याचे पाहायला मिळाले. आतापर्यंत जेव्हा जेव्हा शरद पवार यांची पत्रकार परिषद झाली त्यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या पहिल्या फळीतील अनेक ज्येष्ठ नेते बसलेले दिसायचे. यात छगन भुजबळ, सुप्रिया सुळे, अजित पवार, प्रफुल्ल पटेल, जयंत पाटील अशी अनेक नाव आहेत. मात्र, यावेळी या ज्येष्ठ नेत्यांमध्ये फक्त जयंत पाटील व प्रफुल्ल पटेल शरद पवार यांच्यासोबत पत्रकार परिषदेला होते. अजित पवार मात्र या पत्रकार परिषदेला गैरहजर होते. त्यामुळेच शरद पवार हे तरुणांना पुढे करून कोणता संदेश देऊ इच्छितात का? हा प्रश्न उद्भवतो.
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…
पंढरपूर–‘करिअर करत असताना अपयश आले तरी हरकत नाही, परंतू प्रयत्न मात्र सोडू नयेत. इंजिनिअरिंग पूर्ण…
श्री. पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अभियांत्रिकी महाविद्यालयातील तृतीय वर्षा मध्ये शिकत असणार्या…
पुनर्रचित हवामानावर आधारित फळपेत विमा योजना रब्बी हंगाम २०२३ साठी फळ पिक विमा भरलेल्या शेतकऱ्यांचा…