आर्थिक देवाणघेवाणीवरुन मतभेद झाल्याने तरुणाने आपल्या २६ वर्षीय मैत्रिणीची हत्या केली. हत्येनंतर तरुणाने मैत्रिणीच्या मृतदेहाचे तुकडे केले. केरळातील थ्रिसूर जिल्ह्यातील चालकुडी येथे असलेल्या थुंबूरमुझी जंगलात तरुणीच्या मृतदेहाचे तुकडे पुरलेले आढळले. कुणीही कल्पनाही करणार नाही अशा जागेची निवड अखिलने तिच्या बॉडीचे अवशेष गाडण्यासाठी केली होती.
अथिरा नामक २६ वर्षीय तरुणीने आरोपी अखिल याला काही रक्कम आणि सोन्याचे दागिने उधार दिले होती. मात्र अचानक पैशांची गरज निर्माण झाल्याने अथिराने उसने दिलेले पैसे अखिलकडे परत मागितले. यावरुन वाद झाल्यानंतर अखिलने अथिराची हत्या केल्याचा आरोप आहे.
आपली पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार अथिराचा पती सनिल याने कलाडी पोलिसात केल्यानंतर या प्रकरणाचा उलगडा झाला. २९ एप्रिलपासून अथिराशी सनीलचा कुठलाच संपर्क होत नव्हता.अथिराच्या फोनचे शेवटचे लोकेशन चालकुडी येथे असलेल्या थुंबूरमुझी जंगलात दाखवत होते. त्यामुळे पोलिसांनी या ठिकाणी तपास सुरु केला असता हत्येचा उलगडा झाला.
अथिराला अखिलसोबत एका सुपरमार्केटजवळ कारमध्ये बसताना शेवटचे पाहिल्याचे समोर आले. पोलिसांनी अखिलला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने आपल्या कृत्याची घडाघडा कबुली दिली. अथिराकडून उधारीवर घेतलेले सोने आणि पैसे परत करावे लागू नयेत, या कारणावरुन आपण तिचा खून केल्याचा दावा अखिलने केला.
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…