ताज्याघडामोडी

राज्यातील ‘या’ 7 जिल्ह्यांमध्ये गारपीट आणि मुसळधार पावसाचा इशारा

राज्यातील काही भागांमध्ये अजूनही अवकाळी पावसाचा धुमाकूळ चालूच आहे. एकीकडे प्रचंड उकाडा तर दुसरीकडे मुसळधार पाऊस अशी विचित्र स्थिती सध्या झाली आहे. तर पश्चिम बंगालच्या उपसागरात येत्या दोन दिवसात मोचा चक्रीवादळ धडकणार असल्याचं सांगितलं जात आहे. याचा थेट परिणाम होणार नसला तर हवामानत मात्र पुढचे काही दिवस बदल होण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र तयार झालं आहे. त्यामुळे देशातील अनेक राज्यांमध्ये पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्यात विजांच्या कडकडाटासह मध्यम ते हलक्या स्वरुपाचा पाऊस राहील असं सांगण्यात आलं आहे.

पश्चिम महाराष्ट्रात पुणे, अहमदनगर, नाशिक, मराठवाड्यामध्ये परभणी लातूर आणि हिंगोली या भागांमध्ये गारपीट आणि मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या भागात हवामान विभागाने ऑरेंट अलर्ट दिला असून शेतकऱ्यांना आपल्या पिकांचं संरक्षण करण्याचं आवाहनही केलं आहे.

विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रात गेल्या आठवड्यापासून पावसानं खो घातला आहे. शेतात तयार झालेलं पीक पावसानं भुईसपाट केलं. यवतमाळमध्ये शेतकऱ्याचा कांदा सडला. तर पावसामुळे रब्बी आणि खरीप पिकाचंही मोठं नुकसान झालं. कोकणात आंबा काजूवरही मोठा परिणाम झाला आहे.

पाऊस काही थांबायचा नाव घेत नाही रोज पाऊस होत असून अवकाळी पावसाने सलग दुसऱ्या दिवशी मनमाड शहर परिसरा सोबत ग्रामीण भागाला झोडपून काढले. में महिन्याच्या कडक उन्हाळ्यात पावसाळ्या सारखा पाऊस होत असून त्याचा फटका कांदा आणि टोमॅटो पिकाला मोठ्या प्रमाणात बसल्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

5 days ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 week ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 week ago

कर्मयोगीच्या तब्बल ११० विद्यार्थ्यांची झेंसार कंपनी मध्ये निवड.

श्री. पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अभियांत्रिकी महाविद्यालयातील तृतीय वर्षा मध्ये शिकत असणार्‍या…

2 weeks ago

मंगळवेढा तालुक्यासाठी ६ कोटी ४५ लाख रुपये फळ पिक विमा मंजूर- आ समाधान आवताडे

पुनर्रचित हवामानावर आधारित फळपेत विमा योजना रब्बी हंगाम २०२३ साठी फळ पिक विमा भरलेल्या शेतकऱ्यांचा…

2 weeks ago