ताज्याघडामोडी

बर्थडे केक कापायला निर्जनस्थळी निघाले, दोन मैत्रिणी कारमध्ये बसल्या, पण घडलं भलतंच

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यानगर येथे राहणाऱ्या एका युवतीचा मंगळवारी वाढदिवस होता. सचिन कोळी हा त्या युवतीचा मित्र असून त्याने त्या युवतीच्या मैत्रिणीला मेसेज करून आपण वाढदिवसाचा केक कापूया, असे सांगितले. त्यानुसार रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास सचिन कोळी हा त्याची कार घेऊन विद्यानगर येथे गेला.

वाढदिवसाचा केक कापण्यासाठी निर्जन स्थळी गेलेल्या तिघांना लुटण्यात आलं. दोन मैत्रिणी आणि त्यांच्या एका मित्राला तिघा जणांनी कोयत्याचा धाक दाखवून लुटले. सातारा जिल्ह्यात कराड तालुक्यातील टेंभू येथे काल रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी अज्ञात तिघा आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाढदिवस असलेली युवती आणि तिची मैत्रीण गाडगे महाराज महाविद्यालयासमोर सचिन कोळी याच्या कारमध्ये बसल्या. त्यानंतर सचिनने कार कृष्णा कॅनॉलवरून ओगलेवाडी रस्त्याने टेंभू गावच्या हद्दीतील परिसराकडे नेली. रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास निर्जन ठिकाणी कार थांबल्यानंतर संबंधित दोन्ही युवती आणि सचिन कोळी हा कारमधून उतरून बोलत थांबले होते.

त्यावेळी अचानक तिघे जण त्या ठिकाणी आले. त्यांच्या हातात कोयते होते. एवढ्या रात्री तुम्ही इथे कशाला आलाय, असे म्हणून त्या तिघांनी सचिन कोळी याच्यासह दोन्ही युवतींना धाक दाखवला. एका युवतीच्या कानातील कर्णफुले काढून घेतली. तसेच तिघांचेही मोबाईल त्यांनी काढून घेतले. तिघांना कारमध्ये घालून लुटमार करणाऱ्यांनी कार डोंगराच्या दिशेने पुढे नेली.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर सिंहगडच्या प्लेसमेंटची भरारी; फ्रीस्टीन इन्फोटेकमध्ये चार विद्यार्थ्यांची निवड

संगणक अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना वार्षिक ४ लाखांचे पॅकेज पंढरपूर : प्रतिनिधी अत्याधुनिक शिक्षण, उद्योगाभिमुख प्रशिक्षण आणि…

5 days ago

पंढरपूर सिंहगडच्या प्लेसमेंटचा डंका; सानिकाला ९ लाखांचे पॅकेज

कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या संगणक अभियांत्रिकी विभागातील अंतिम वर्षाची विद्यार्थिनी…

7 days ago

अजितदादांच्या जयंतीनिमित्त अजितदादा सुकन्या योजना राबविणार

लोकनेता पुरस्कार देवून सन्मान करणार - राष्ट्रवादीचे श्रीकांत शिंदे यांचा स्तुत्य उपक्रम लोकनेते तथा महाराष्ट्राचे…

1 week ago

स्थापत्य अभियांत्रिकी विभागात व्हॅल्यू एडिशन प्रोग्राम उत्साहात संपन्न

पंढरपूर : एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी, पंढरपूर येथील स्थापत्य अभियांत्रिकी विभागामार्फत…

1 week ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूटच्या प्रा. बाबर व प्रा. लंबे यांच्या संशोधनाला भारत सरकारचे पेटंट

श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पंढरपूर येथील प्राध्यापक डॉ. अनिल बाबर आणि…

2 weeks ago

पंढरपूर सिंहगडच्या दोन विदयार्थ्यांची स्टर्लिंग अँड विल्सन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये निवड वार्षिक ५ लाख पॅकेजची नोकरी

पंढरपूर: प्रतिनिधी कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील मेकॅनिकल इंजिनियरींग विभागात चतुर्थ…

2 weeks ago