पत्नीच्या गुप्तांगाला हिटरने चटके देऊन जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित करून, त्यानंतर लोखंडी खलबत्त्याने मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार कोंढवा परिसरात घडला. या प्रकरणी कोंढवा पोलिसांनी ४० वर्षीय पतीला अटक केली आहे. मुलीचा मोबाइल पत्नीच्या हातात पाहून पतीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन हे क्रूर कृत्य केले. पीडिता गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचारसुरू आहेत.
या प्रकरणी ३५ वर्षीय पीडित महिलेने कोंढवा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारदार महिला, आरोपी पती आणि त्यांची चार मुले कोंढवा खुर्द येथील अश्रफनगर येथे राहतात. ३० एप्रिलला आरोपीने मुलीचा मोबाइल पत्नीच्या हातात असल्याचे पाहिले. त्यामुळे आरोपी चिडला. त्याने पत्नीवर संशय घेऊन त्याने तिला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर आरोपीने पत्नीला बेडरूममध्ये नेऊन दरवाजा बंद करून घेतला. मुले घरातच होती; ती आरडाओरडा करत होती.
आरोपी पतीने दरवाजा उघडला नाही. त्याने पत्नीला बेडला बांधून ठेवले. पाणी गरम करण्याच्या हिटरने तिला चटके दिले. त्यानंतर तिच्यावर जबरदस्ती करून क्रूर पद्धतीने त्रास दिला आणि लोखंडी खलबत्त्याने मारहाण केली. आईच्या ओरडण्याचा आवाज ऐकून मुले मोठमोठ्याने रडत होती. त्यांचा आवाज ऐकून आरोपी पतीने दार उघडले आणि त्यांच्या अल्पवयीन मुलींसमोर अश्लील वर्तन केले. त्यानंतर पीडितेला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिने दिलेल्या जबाबावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन घेऊन तिला हिटरचे चटके देऊन जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याची संतापजनक घटना पुण्यातील कोंढवा परिसरात घडली आहे. याप्रकरणी पत्नीने कोंढवा पोलिसांत पतीविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर पत्नीवर अत्याचार करणाऱ्या 40 वर्षीय नराधम पतीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. क्रौर्याची परिसिमा गाठलेल्या या प्रकाराने पोलीसही स्तब्ध झाले. गंभीर जखमी झालेल्या पत्नीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…
पंढरपूर–‘करिअर करत असताना अपयश आले तरी हरकत नाही, परंतू प्रयत्न मात्र सोडू नयेत. इंजिनिअरिंग पूर्ण…
श्री. पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अभियांत्रिकी महाविद्यालयातील तृतीय वर्षा मध्ये शिकत असणार्या…
पुनर्रचित हवामानावर आधारित फळपेत विमा योजना रब्बी हंगाम २०२३ साठी फळ पिक विमा भरलेल्या शेतकऱ्यांचा…