देशात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ होत आहे. अनैतिक संबंधातून हत्या, आत्महत्येच्या घटना घडत आहेत. पण त्यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. घाघरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पालमा गावात लग्नाच्या पाच दिवसांपूर्वी रवी गोप नावाच्या तरुणाची हत्या झाली होती. याप्रकरणी हत्येची उकल करत गुमला पोलिसांनी धक्कादायक खुलासा केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रवीचे लग्न दुसऱ्या तरुणीशी ठरल्याने रवीची प्रेयसी त्याच्यावर रागावली होती. त्यामुळे तिने त्याला रात्री भेटण्याच्या बहाण्याने बोलावून त्याची हत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी याच गावातील शांती हिला खुनाच्या आरोपाखाली अटक करून तिची तुरुंगात रवानगी केली.
गुमला एसडीपीओ मनीष चंद्र लाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, रवी गोपचे शेजारीच राहणाऱ्या शांतीसोबत 7-8 वर्षांपासून प्रेमसंबंध होते. काही दिवसांपूर्वी रवीचे लग्न दुसऱ्या एक तरुणीशी ठरले. त्यामुळे रवी गोप याचा विवाह आज 1 मे रोजी होणार होता. घरात लग्नाचे विधी सुरू झाले होते. मात्र, रवीचे दुसऱ्या ठिकाणी लग्न जमल्याने त्याची प्रेयसी ही प्रचंड रागात होती.
अशातच रवीची प्रेयसी शांती हिने 26 एप्रिलच्या रात्री रवीला भेटण्यासाठी गावापासून 100 मीटर अंतरावर असलेल्या तिच्या पेंढ्याच्या शेडमध्ये बोलावले. इथे रवी आणि शांती यांच्यात खूप वाद झाला. रवीने लग्नाचे आमिष देऊन तिच्यासोबत अनेकवेळा शारिरीक संबंध ठेवल्याने तिला प्रचंड राग आला होता. तब्बल तीन वेळा औषध देऊन तिचा गर्भपातही करण्यात आला. पण वेळ आल्यावर तो शांतीशी नव्हे तर दुसऱ्याच तरुणीसोबत लग्न करत होता.
शांतीने पोलिसांना सांगितले की, त्या रात्री दोघेही पुवाल बारीच्या हद्दीत बसून बोलत होते. या संवादाचे रुपांतर वादात झाले. दरम्यान, या वादाला कंटाळून रवीने शांतीचा दुपट्टा घेतला आणि गळ्यात बांधला. माझे घरचे लोक तुझ्याशी लग्न करण्यास राजी होणार नाहीत. म्हणूनच मी माझा जीव देतो, असे तो बोलू लागला. त्याने लग्नाचे आमिष देत ऐनवेळी दुसऱ्या तरुणीशी लग्न करत असल्याने शांतीला त्याचा आधीच राग आला होता. त्यामुळे यावेळी तिने रवीला अचानक सीमेवरून ढकलले, त्यामुळे दुपट्टा त्याच्या गळ्यात अडकला आणि त्याचा जीव गुदमरायला लागला आणि काही वेळाने त्याचा मृत्यू झाला.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…