मागील काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे नेते दावे करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार हे महाराष्ट्राचे ‘भावी मुख्यमंत्री’ असतील, अशा आशयाचे काही बॅनर महाराष्ट्रात विविध ठिकाणी लागले होते. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी तर थेट पुढचा मुख्यमंत्री आमचाच होणार असं जाहीर केलं होतं. यावर आता अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
यावेळी “2024 ला राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री होणार” या जयंत पाटलांच्या विधानाबाबत विचारलं असता अजित पवार म्हणाले, “जयंत पाटलांच्या तोंडात साखर पडो, त्यांचं म्हणणं खरं ठरो.” महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढल्यास फायदा होईल का? असं विचारलं असता अजित पवार पुढे म्हणाले, “महाविकास आघाडीने एकत्र निवडणूक लढल्यास निश्चित फायदा होईल, हे सांगण्यासाठी एखाद्या ज्योतिषाची गरज नाही, तीन पक्षांची ताकद एकत्र आल्यानंतर ज्या उद्देशाने भाजपाने एकनाथ शिंदे यांना बरोबर घेऊन सरकार अस्तित्वात आणलं, याला दहा महिने पूर्ण झाले, पण जनतेच्या मनात या सरकारबद्दल समाधान असल्याचं दिसत नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्याबरोबर जे जे आमदार गेले, त्यांच्या मतदारसंघातील मार्केट कमिटीच्या निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाल्याचं पाहायला मिळालं, असंही अजित पवार पुढे म्हणाले.
इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…