मुलगी आंतरजातीय विवाह करणार असल्याच्या रागातून ७९ वर्षीय वृद्धपित्याने नवरी मुलगी आणि स्वतःच्या पत्नीवर जीवघेणा हल्ला केल्याची घटना अंधेरी पश्चिमेकडील सात बंगला वर्सोवा भागात घडली आहे. प्रभाकर शेट्टी असे हल्ले करणाऱ्या वृद्ध नागरिकाचे नाव असून त्याने पत्नी आणि स्वतःच्या मुलीवर हातोडा आणि चाकूने जीवघेणा हल्ला केला. या प्रकरणी आरोपी प्रभाकर शेट्टी याला वर्सोवा पोलिसांनी अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सात बंगला परिसरात राहणारे निवृत्त डॉक्टर प्रभाकर शेट्टी (वय ७९) हे आपली मुलगी प्रणिता (वय ३८) आंतरजातीय विवाह करत असल्याने नाराज होते. विरोधानंतरही मुलीने मनाविरुद्ध जाऊन साखरपुडा केल्यामुळे प्रभाकर शेट्टी आणि त्यांची मुलगी व पत्नी गीता यांच्यात वारंवार खटके देखील उडू लागले होते.शेट्टी यांनी आपल्या मुलीच्या लग्नाच्या प्लॅनवर आक्षेप घेतला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० एप्रिल रोजी प्रणिताच्या नियोजित लग्नाला शेट्टी यांनी आक्षेप घेतला होता. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, शेट्टीची पत्नी आणि मुलीसोबत लग्नावरून वारंवार भांडणे होत होती आणि त्याच्या कुटुंबीयांनी लग्नाच्या निमंत्रण पत्रिकेवर शेट्टी यांच्या नावाचा उल्लेख देखील केला नव्हता.
पहाटे ३.३० वाजता गीता त्यांच्या बेडरूममध्ये झोपलेली असताना शेट्टीने तिच्या डोक्यावर हातोड्याने वार केले. त्यानंतर त्याने दोरीचा वापर करून तिचा गळा दाबण्यास सुरुवात केली. त्याने तिच्या मानेवर आणि छातीवर चाकूने वार केले. या आवाजाने हॉलमध्ये झोपलेली प्रणिता आवाजाने जागी झाली. ती बेडरूममध्ये गेली आणि शेट्टीने तिच्यावर चाकूने हल्ला केला.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…