ताज्याघडामोडी

जोडप्याचं टोकाचं पाऊल, दीड वर्षांचा चिमुकला दोन दिवस शेजारीच बसून; तिसरा दिवस उजाडला अन्..

मध्य प्रदेशच्या ग्वाल्हेरमध्ये दीड वर्षांचा मुलगी तीन दिवस त्याच्या आई वडिलांच्या मृतदेहांसोबत बंद घरात राहत होता. तहान भुकेनं व्याकूळ झालेला चिमुरडा बेशुद्ध पडला. त्यामुळे त्याच्या रडण्याचा आवाजदेखील शेजाऱ्यांना ऐकू गेला नाही. मृतदेह कुजू लागल्यानं दुर्गंधी पसरु लागली. त्यानंतर शेजाऱ्यांनी पोलिसांना बोलावलं. त्यांनी दार तोडलं. तेव्हा आत जोडप्याचे मृतदेह गळफास लावलेल्या स्थितीत दिसले आणि निष्पाप चिमुकला बेशुद्धावस्थेत पडला होता. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले.

ग्वाल्हेरच्या शहराच्या उपनगरात असलेल्या मद्दी बाजार परिसरात ही घटना घडली. सोनू उर्फ नूर आलम सलूनमध्ये काम करायचा. तो पत्नी शबाना आणि तीन मुलांसह राहायचा. त्याची दोन मुलं आजीच्या घरी गेली होती. त्यामुळे घरी सोनू, त्याची पत्नी शबाना आणि दीड वर्षांचा मुलगा होता. सोनू्च्या घरातून शेजाऱ्यांना कुजल्याचा वास येऊ लागला. शेजाऱ्यांनी सोनूच्या घराचा दरवाजा उघडायचा प्रयत्न केला. मात्र तो उघडला नाही.

यानंतर शेजाऱ्यांनी सोनूची आई जोहराबाई आणि पोलिसांना माहिती दिली. थोड्याच वेळात सोनूचे कुटुंबीय, नातेवाईक आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी दार तोडलं. आतलं दृश्य सगळेच जण हादरले. घराच्या आत एका खोलीत सोनूचा मृतदेह पंख्याला लटकला होता. मृतदेह कुजण्यास सुरुवात झाली होती. दुसऱ्या खोलीत पत्नी शबानाचा मृतदेहदेखील लटकत होता. त्यांचा दीड वर्षांचा मुलगा बेशुद्धावस्थेत पडून होता. पोलिसांनी तातडीनं दोघांचे मृतदेह खाली उतरवले आणि शवविच्छेदनासाठी पाठवले.

सोनूला स्मॅकचं व्यसन होतं, अशी माहिती त्याच्या आईनं दिली. सोनूला असलेल्या व्यसनामुळे घरात वाद व्हायचे. नशेच्या अमलाखाली असताना तो पत्नी आणि मुलांना मारहाण करायचा. अनेकदा तो कामालादेखील जायचा नाही, असं सोनूच्या आईनं सांगितलं. सोनूच्या दीड वर्षीय मुलावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सोनू आणि शबानाच्या आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

19 hours ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

2 days ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago