एका तरुणाचं लग्न अवघ्या ५ दिवसांवर होतं. घरात सर्व तयारी झाली होती, अंगणात मांडव पडला होता. पण, तेवढ्यात घरी अशी बातमी आली की आनंदाचं रुपांतर शोकात झालं. ५ दिवसांनंतर बोहल्यावर चढणारा हा तरुण गावातील एकाच्या लग्नाला गेला होता. तेथून घरी परतत असताना अज्ञातांनी त्याच्यावर हल्ला चढवला. त्याला मारहाण केली आणि गळा आवळून त्याचा खून केला. जेव्हा तो रात्री उशिरापर्यंत घरी आला नाही तेव्हा घरच्यांना त्याची काळजी वाटू लागली. आपला मुलगा सकाळी घरी येईल अशी आशा घरच्यांना होती. पण, त्याच्याजागी त्याच्या मृत्यूच्या बातमीने दार ठोठावलं.
सकाळी थेट या तरुणाचा मृतदेह आढळून आला. रवी यादव असं या तरुणाचं नाव होतं. या घटनेची माहिती मिळताच एसडीपीओ मनीष चंद्र लाल हे पथकासह घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. तसेच, पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करुन घेत तपास सुरू केला आहे.
मृताचा भाऊ अरविंद यादव याने सांगितले की, रवी लग्नासाठी रात्री बाहेर गेला होता. परत येण्यास उशीर झाल्याने त्याला बोलवणं पाठवलं. त्याने फोन करून येतो असं सांगितले. पण, रात्रभर तो घरी परतलाच नाही. सकाळी गावातील लोक शेताकडे गेले असता त्यांना रवीचा मृतदेह आढळून आला. त्याच्या शरीरावर जखमेच्या खुणा होत्या. गळा आवळून त्याचा खून करण्यात आला असल्याची माहिती आहे.
या प्रकरणाचा तपास करत असलेले एसडीपीओ मनीष चंद्र लाल यांनी सांगितले की, तरुणाच्या हत्येची माहिती मिळाली आहे. त्याचा मृतदेह गावातील पेंढ्याजवळ आढळून आला. गळा आवळून खून केल्याचे नातेवाईक बोलत आहेत. पोलिस विविध बाजूने या घटनेचा तपास करत आहेत. लवकरच या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात येईल. ज्या गावात रवीचा मृतदेह सापडला, त्याच गावातील तरुणीशी त्याचे प्रेमसंबंध असल्याची चर्चा आहे.
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…