१८ वर्षांचा संसार, दोन मुलं पती-पत्नी दोघांचही एकमेकांवर जीवापाड प्रेम सर्व सुरळीत सुरू असताना अचानक नवऱ्याला बायकोचं एक सत्य समजलं अन् इतक्या वर्षांचा संसार एका क्षणात उद्ध्वस्त झाला. बायकोचं सत्य समजल्यावर पती नैराश्यात गेला आहे. तर त्याने घरदेखील सोडले आहे.
२० वर्षांपासून दोघे एकमेकांना ओळखत होते. त्यानंतर दोन वर्षांनी त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. त्यानंतर दोघांनी मिळून एका व्यावसायाची सुरुवात केली. व्यावसाय सुरू केल्यानंतर मात्र त्यांच्यात वाद झाले आणि ते वेगळे झाले. मात्र, काही दिवसांतच दोघांनाही जाणीव झाली आणि ते पुन्हा एकत्र राहू लागले. याचदरम्यान महिलेला ती गरोदर असल्याची जाणीव झाली. आपल्या संसारात आणखी एक पाहुणा येणार म्हणून दोघे खुश होते. दोघांनीही त्यादिवसानंतर कधीच भांडायचं नाही व वेगळं व्हायचं नाही, असं ठरवलं. काही दिवसांनी दोघांनाही जुळी मुलं झाली. त्यांच्या लग्नाला आता १८ वर्ष पूर्ण झाली आहेत. मात्र, त्याचवेळी संसारात एक वादळ आलं.
पतीने लग्नाच्या १८ वर्षानंतर डिएनए टेस्ट केली. या टेस्टनंतर त्याच्यासमोर पत्नीचं धक्कादायक सत्य आलं. इतकी वर्ष तो ज्यांना मुलं म्हणून प्रेम देत होता त्या मुलांचा तो बाप नसल्याचं समोर आलं आहे. या अचानक कळलेल्या सत्याने तो पुरता हादरला आहे. त्यांने यासंबंधी पत्नीला जाब विचारल्यानंतर तिने जे सांगितलं ते ऐकून त्याला धक्काच बसला.
लग्नानंतर जेव्हा त्या दोघांमध्ये वाद झाले होते तेव्हा ती दोन आठवड्यांसाठी घर सोडून गेली होती. त्याचवेळी दारूच्या नशेत तिचे एका अनोळखी व्यक्तीसोबत संबंध निर्माण झाले. त्यानंतर काही दिवसांत ती गरोदर असल्याचे तिला कळले. मात्र, तिच्या पतीला हे सगळं सांगण्याची तिची हिम्मत झाली नाही. आता पतीला हे सत्य कळल्यानंतर तिने त्याची अनेकदा माफी मागितली आहे. मात्र, तो अजूनही तिला माफ करु शकत नाहीये. पतीने घर सोडले असून तो एका हॉटेलमध्ये राहतोय. एका सोशल मीडिया साइटवर त्याने हा अनुभव सांगितला आहे. तसंच, आता माझ्यात पत्नीचा चेहरा पाहायचीही हिम्मत होत नाही, असं त्याने म्हटलं आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…