ताज्याघडामोडी

तरुणीचा बोलण्यास नकार, संतप्त तरुणाचं संतापजनक कृत्य; वाचून तुम्हीही डोक्याला हात माराल

एकतर्फी प्रेमातून तरुणीच्या इमारतीच्या पार्किंदमध्ये जाऊन दुचाकीसह तीन दुचाकी पेटवल्याची धक्कादायक घटना लोहगाव भागात घडली आहे. या प्रकरणी एका युवकाला विमानतळ पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी युवकाच्या साथीदाराच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यातील लोहगावमधील तरुणीच्या वडिलांनी विमाननगर पोलीस स्टेशनमध्ये आरोपी विरोधात तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी श्रीराम घाडगे (रा. वाघोली, पुणे) आणि त्याच्या साथीदारावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार खांदवेनगर येथे सोमवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांची मुलगी आणि आरोपी श्रीराम घाडगे हे विमाननगर परिसरात एका कॉलेजमध्ये शिकत आहे. श्रीराम याने तरुणीला एकतर्फी प्रेमातून “माझ्यासोबर बोलत जा”, असं म्हणून तिला सतत त्रास देत होता. तिने ही गोष्ट तिच्या वडिलांना सांगितली. तेव्हा त्यांनी आरोपी श्रीराम घाडगे याला “तिला तुझ्यासोबत बोलायचे नाही. उगाच त्रास देऊ नकोठ”, असं सांगितलं.

तरुणाने त्याचा राग मनात धरुन एका साथीदाराला सोबत घेतलं. सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास तक्रारदार यांच्या पार्किंगमध्ये लावलेल्या दुचाकीला थेट आग लावली. त्यात त्यांच्या शेजारी असलेल्या आणखी दोन दुचाकींनाही आग लागून त्यांचे नुकसान झालं आहे. या प्रकरणी पोलीस हवालदार एस धेंडे पुढील तपास करत आहेत.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

19 hours ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

2 days ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago