ताज्याघडामोडी

नवऱ्याचं निधन; तेराव्याच्या दिवशीच बायकोवर अतिप्रसंग; दीराचं धक्कादायक कृत्य

पतीच्या निधनानंतर अवघ्या तेराव्याच दिवशी पत्नीच्या वाट्याला छळ आल्याची संतापजनक घटना पैठण तालुक्यातील दावरवाडी येथे घडली आहे. तेराव्याचा विधीचा कार्यक्रम आटोपल्यानंतर ही घटना घडली असून या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दावरवाडी येथील एका महिलेच्या पतीच्या निधनानंतर त्याच्या तेराव्याचा कार्यक्रम आवरला होता. त्यानंतर आरामासाठी मृत व्यक्तीची पत्नी आपल्या चुलत सासूच्या घरी आरामासाठी थांबली होती. त्यावेळी महिलेच्या चुलत दीराने घरी कोणी नसल्याचा गैरफायदा घेत तिच्यावर बलात्कार केला असल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे.

दरम्यान, महिलेनं नकार देऊनही बळजबरीने चुलत दीराने बलात्कार केल्याने सदर महिलेनं पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला असून अधिकचा तपास सुरु असल्याचं सांगितलं आहे. पण, पतीच्या निधनानंतर अवघ्या तेराव्याच्या दिवशीच पत्नीवर हा प्रसंग ओढावल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

20 hours ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

2 days ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago