ताज्याघडामोडी

पाऊस आल्याने ऑटोत बसला, चालकाकडून शिवीगाळ, राग आल्याने झोपेतच दगड घालून संपवलं

सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हनुमान गली येथील गुजरात लॉजसमोर शुक्रवारी सकाळी एका व्यक्तीचा मृतदेह सापडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी पोहचून मृतदेहाची तपासणी केली असता ऑटोचालक राजकुमार यादव असं त्याचे नाव असल्याचे समोर आले. अज्ञात आरोपीने त्याची दगडाने ठेचून निर्घृण हत्या केली होती. परिसरात बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने काही मिनिटांतच पोलिसांनी हत्या करणाऱ्या आरोपीची ओळख पटवली.

साहिल अजय राऊत (वय २०) असं आरोपीचं नाव असून हा आनंद नगरचा रहिवासी आहे. वास्तविक साहिलचे वडीलही ऑटोचालक आहेत. घरातील मोबाईल नेटवर्क नीट काम करत नसल्याने तो अनेकदा वायफाय वापरून मोबाईल फोनवर डाऊनलोडींग करण्यासाठी या रस्त्यावर येत असे. घटनेच्या रात्रीही तो रस्त्यावरील ओट्यावर बसून मोबाईलमध्ये डाउनलोडींग करत होता. त्याचवेळी पाऊस सुरू झाला आणि तो तिथे उभ्या असलेल्या ऑटोमध्ये जाऊन बसला.

ऑटोचालक आपली ऑटो बाजूला लावून जवळच्या ओट्यावर झोपला होता. त्याचवेळी ऑटोचालकाला जाग आली आणि त्याने तरुणाला शिवीगाळ करत खडसावले. घाणेरड्या शिव्या ऐकून साहिल दुखावला आणि त्याने रस्त्यावरून एक दगड उचलून राजकुमारच्या डोक्यावर मारला. राजकुमार मेला नाही हे त्याला कळले. काही वेळाने मागे फिरल्यानंतर पकडले जाऊ या भीतीने साहिलने पुन्हा दगड उचलला आणि राजकुमाराची निर्घृण हत्या केली.

घटना घडल्यानंतर तो पकडला जाईल या भीतीने तरुणाने मोर्शीजवळील कोळवीर गावात मावशीच्या घरी पळ काढला होता. ज्याला काही तासातच गुन्हे शाखा युनिट २ च्या पथकाने अटक केली. विशेष बाब म्हणजे आरोपी साहिल काही दिवसांपूर्वी भंडारा येथे झालेल्या पोलीस भरतीतही सहभागी झाला होता.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

15 hours ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

2 days ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago