ताज्याघडामोडी

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस पडणार; हवामान विभागाचा इशारा

गेल्या महिन्यापासून राज्यातील हवामानातं मोठा बदल सातत्याने पाहायला मिळत आहे. हवामानातील या बदलामुळे राज्यात सध्या अवकाळी पाऊस आणि गारपीट होत आहे.गेल्या महिन्यात देखील जवळपास दहा ते पंधरा दिवस राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली होती. 

या चालू महिन्यात विशेषता गेल्या पंधरा दिवसांपासून राज्यातील बहुतांशी जिल्ह्यात अवकाळी पावसाने आणि गारपिटीने अक्षरशः थैमान माजवल आहे. यामुळे शेतकरी वर्ग मोठा धास्तावला आहे. सध्या कोसळत असलेल्या अवकाळी पावसामुळे नुकसान तर होतच आहे. शिवाय शेतकऱ्यांना सध्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने येणारा मान्सून हा कमकुवत असेल अशी भीती देखील वाटू लागली आहे.

अशातच, आता भारतीय हवामान विभागाने राज्यात पुढील दोन दिवस पुन्हा एकदा पावसाची शक्यता वर्तवली असल्याने हा जर हवामान विभागाचा अंदाज खरा ठरला तर शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखीनच भर पडणार आहे. वसंत नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या हवामान विभागाने नुकताच एक हवामान अंदाज वर्तवला आहे. 

कृषी विद्यापीठाच्या हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार मराठवाड्यात पुढील दोन दिवस विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. सदर हवामान अंदाजानुसार 24 एप्रिल रोजी अर्थातच येत्या सोमवारी मराठवाड्यातील लातूर धाराशिव आणि बीड या तीन जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता कायम राहणार आहे.

याशिवाय 25 एप्रिल रोजी देखील मराठवाड्यातील काही जिल्ह्यात पावसाची शक्यता राहणार आहे यामध्ये हिंगोली, जालना, बीड, लातूर, धाराशिव, परभणी व नांदेड या जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडू शकतो असं कृषी विद्यापीठाच्या हवामान विभागाने नमूद केले आहे. विशेष बाब अशी की हे दोन दिवस पडणारा पाऊस वादळी वाऱ्यासह पडेल असं यावेळी नमूद करण्यात आला आहे.

यामुळे निश्चितच मराठवाड्यातील वर नमूद केलेल्या संबंधित जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आणि सामान्य जनतेला अधिक सजग आणि सतर्क रहावे लागणार आहे. विशेष म्हणजे मराठवाड्यात काही भागात सध्या अवकाळी पाऊस पडतच आहे. त्यामुळे आधीच संकटात असलेल्या शेतकऱ्यांच्या संकटात यामुळे आणखीनच भर पडणार आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

15 hours ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

2 days ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago