राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी नुकतेच पुण्यातील एका प्रकट मुलाखतीत आपली मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली होती. यावर अनेक राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहे. यावर अमृता फडणवीस यांना विचारले असता त्यांनी दिलखुलास उत्तर दिलं आहे. “अजित पवारच नाही तर महाराष्ट्रासाठी 24 तास झोकून देऊन काम करणारा कोणताही माणूस मला मुख्यमंत्री झालेला आवडेल” असं अमृता म्हणाल्या. पुण्यातील एका उद्घाटनाच्या अमृता फडणवीस उपस्थित होत्या. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
“मला कोणीही मुख्यमंत्री झाले तर आवडेल. महाराष्ट्रासाठी 24 तास झोकून देऊन काम करणारा कोणताही माणूस मला मुख्यमंत्री झालेला आवडेल”, असं दिलखुलास उत्तर अमृता फडणवीस यांनी दिलं आहे. अजित पवार जर भाजपमध्ये आले आणि त्यांनी भाजपमध्ये येऊन मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली तर या प्रश्नावर बोलताना फडणवीस म्हणाल्या, मला वाटतं महाराष्ट्र असं राज्य आहे जे खूप काही करू शकतं. खूप काही करत आहे. यासाठी जो माणूस आपल्याला जनतेला पुढे नेतो तो व्यक्ती किंवा पक्ष चांगला आहे. मग तो कोणीही असला तरी चालेल. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या मैत्रीबद्दल विचारले असता, त्यांच्यात मैत्री कशी आहे, हे माझ्यापेक्षा त्या दोघांना जास्त माहीत. राजकारणी लोक त्यांच्या मैत्रीत अनेकदा डोळे मारतात, असा टोलाही अजित पवार यांना लगावला.
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…