ताज्याघडामोडी

आधी महिलेवर प्रेम जडलं, नंतर तिच्या मुलीला पाहून नियत फिरली, मुलीने आईला सांगितल्यानंतर थरकाप उडाला

एका प्रौढ माणसाने डेटींग अॅपद्वारे एका महिलेशी ऑनलाईन गप्पा मारत तिला आपल्या जाळ्यात ओढले. अनेक महिने या महिलेशी त्याचे फोनवरुन चॅटींग सुरू होते. परंतू या महिलेनं आपल्याला एक मुलगी असल्याचे सांगत आपण एकत्र येऊ शकत नसल्याचे स्पष्ट करत त्याच्याशी बोलायचे बंद केले. त्यानंतरही त्या प्रौढ माणसाने तिच्याशी मैत्री चालूच ठेऊन अखेर ते एकत्र येऊन राहू लागले. परंतू त्यानंतर त्याची नियत फिरली आणि त्याने या महिलेच्या अल्पवयीन मुलीचा गैरफायदा घेण्यास सुरूवात केली.

उत्तर प्रदेशातील बांदा बबेरू कोतवाली गावात राहणाऱ्या एका प्रौढ व्यक्तीने डेटींग अॅपच्या मदतीने राजस्थानातील एका महिलेशी मैत्री केली. या महिलेला आधीच्या पतीपासून एक अल्पवयीन मुलगी होती. फोनवरील मैत्रीनंतर ही महिला त्याच्यासोबत बांदा येथे एकत्र एक वर्षांपासून राहू लागली. त्यानंतर या प्रौढ व्यक्तीसोबत ही महिला पत्नीसारखी राहू लागली आणि तिच्या मुलीला त्याने आपली मुलगी समजण्याचे नाटक केले. या महिलेनं वारंवार मुंबईला जाण्याचा हट्ट त्याच्याकडे धरला. परंतू त्याने कशीतरी तिची मनधरणी करत तिला शांत करत राहिला.

काही काळानंतर या प्रौढ व्यक्तीची नियत फिरली आणि अखेरीस त्याने घरी कोणी नाही पाहून अल्पवयीन मुलीसोबत अत्याचार केला. १९ एप्रिल रोजी या कथित पतीने तिच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. तिने विरोध केल्याने त्याने तिला मारहाण केली. ती जोरजोरात ओरडत असल्याने आणि कुणाला तिने काही सांगू नये म्हणून तिला मारहाण करत चक्क तिचा हातच मोडला. त्यानंतर तिची आई घरी आल्यावर तिने सर्व घटनाक्रम सांगितला. त्यानंतर या महिलेनं पोलीस ठाणे गाठून तक्रार केली.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

16 hours ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

2 days ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago